Gujarat Election : ‘गुजरातेत बदलाची मूक लाट’

जिग्नेश मेवानी : राज्यात १८० पैकी १२० जागा काँग्रेस जिंकेल
Gujarat Assembly Election
Gujarat Assembly Election
Updated on

वडगाम (गुजरात) : बदलाच्या मूक लाटेने भाजपशासित गुजरातला कवेत घेतले असून राज्यात आता बदल अटळ आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून देशाला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १८२ पैकी १२० जागा जिंकेल, असेही ते म्हणाले. ही निवडणूक लोकशाही, बेरोजगारीविरुद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या तिकिटावर वडगाममधून मेवानी दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या त्यांच्या मतदारसंघात ते जोरदार प्रचारमोहीम राबवीत असून दररोज १० गावांना भेटी देत आहेत. यापूर्वी, २०१७ मध्ये ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. मेवानी म्हणाले, की काँग्रेस १२० जागांवर विजय मिळवून गुजरातच्या पुनर्बांधणीचा पाया रचेल. राज्यात आता बदल अटळ आहे. भाजप नेहमीप्रमाणे हिंदुत्वासारख्या भावनिक मुद्द्याचा आधार घेत असला तरी यावेळी हा डाव यशस्वी होणार नाही. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन मतदारांनी मला मतदान करावे.

लोकांनी मोदींना प्रेमाने एकदा नव्हे तर दोनदा पंतप्रधान केले. मात्र, अनेक वर्षांनंतरही बेरोजगारी, महागाई वाढतच आहे. राज्य सरकार आपल्याविरुद्ध आवाज उठविणारे विरोधी पक्षनेते, वकील, पत्रकारांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे, आपले सरकार दडपशाही करत असल्याचे लोकांनी ओळखले आहे. पंतप्रधान मोदींची कसलाही प्रभाव नाही. त्यांनी तो पैसा, जनसंपर्क व प्रतिमानिर्मितीतून उभा केला आहे. अधिकाऱ्यांचा वापर न करता व बसची सोय न केल्या किती लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येतील, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांकडे आता नवीन सांगण्यासारखे काहीही नाही. लोकांच्याही त्यांच्याकडून आता फार अपेक्षा नाहीत. त्यांनी आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मेवानी म्हणाले...

  • पंतप्रधानांनी आश्वासन दिलेले स्मार्ट सिटी, दोन कोटी नोकऱ्या कोठे आहेत?

  • मोदींच्या अच्छे दिनाच्या घोषणेचे काय झाले?

  • गुजरातेत आपच्या रूपाने तिसरा पर्याय नाही. आपला एकही जागा मिळणार नाही

  • एमआयएममुळे वडगाममध्ये मतविभागणी होऊ शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.