Rivaba Jadeja: जडेजाच्या पत्नीची जामनगरमध्ये जोरदार बॅटिंग; विजयाच्या उंबरठ्यावर

जडेजाच्या पत्नीच्या गळ्यात लवकरच आमदारकीची माळ पडणार
Rivaba Jadeja: जडेजाच्या पत्नीची जामनगरमध्ये जोरदार बॅटिंग; विजयाच्या उंबरठ्यावर
Updated on

गुजरात निवडणुक निकालामध्ये भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा सध्या चर्चेत आली आहे. रिवाबा या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या गळ्यात लवकरच आमदारकीची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे. (Gujarat Assembly Election Ravindra Jadeja wife Rivaba Jadeja leads)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. उत्तर जामनगरमधून रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. रिवाबा जडेजाने तिचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे उमेदवार करसनभाई कर्मूर यांच्यावर १२०२७ मतांची आघाडी घेतली आहे.

Rivaba Jadeja: जडेजाच्या पत्नीची जामनगरमध्ये जोरदार बॅटिंग; विजयाच्या उंबरठ्यावर
Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी; वाचा निकालाचे अपडेट्स

तसेच, रिवाबा यांच्याविरोधात रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनीच उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे, आपल्या वहिनींच्या विरोधातच नयना यांनी प्रचारात रणशिंग फुंकले होते. याठिकाणी काँग्रेसकडून बिपेंद्रसिंह जडेजा हे काँग्रेस उमेदवार आहेत. मात्र, रिवाबा यांना पहिल्या तीन फेऱ्यांत आघाडी मिळाली आहे.

विशेष म्हणजे रिवाबा यांचे सासरेही सुनेच्या विरोधात प्रचार करत होते. सुनेला नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी जनतेला केले होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेकडो समर्थकांसह जामनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. त्या सौराष्ट्र करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या. आता, त्या भाजप उमेदवार असून निवडणूक जिंकल्यास पहिल्यांदाच आमदार होण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.