Gujarat Election Result 2022: गुजरातमधील हॉट सीट्सची काय आहे स्थिती?; पाहा प्रतिष्ठेच्या लढती

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.
Gujarat Election Result 2022
Gujarat Election Result 2022esakal
Updated on

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाची स्थिती सांगायची झाली तर यामध्ये भाजप १५८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे. इतकंच नव्हे तर नवा रेकॉर्डही भाजपनं केला आहे. (Gujarat Assembly Election Result 2022 What is status of all hot seats in Gujarat)

Gujarat Election Result 2022
Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी; वाचा निकालाचे अपडेट्स

गुजरातमध्ये १८२ जागांसाठी यंदा १,६२१ उमेदवार रिंगणार होते. यामध्ये मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह गुजरात सरकारच्या अनेक मंत्र्यांचं नशिबही पणाला लागलं आहे. त्याशिवाय हार्दिक पटेल, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी, काँग्रेस नेते इंद्रनील राजगुरु यांच्यासारखे दिग्गज नेत्यांचा निकालही लागणार आहे.

Gujarat Election Result 2022
Congress : गुजरातमध्ये काँग्रेसचा आजवरचा सर्वात दारुण पराभव; 5 मोठी कारणं

जाणून घेऊयात गुजरातच्या १० हॉटसीट्सचं समीकरण

जागा उमेदवार कोण पुढे/मागे

  1. घाटलोडिया भूपेंद्र पटेल (भाजपा) आघाडीवर

  2. वीरमगाम हार्दिक पटेल (भाजपा) आघाडीवर

  3. खंभालिया इसुदान गढवी (आप) पिछाडीवर

  4. जामनगर रिवाबा जडेजा (भाजपा) आघाडीवर

  5. राजकोट पूर्व इंद्रनील राजगुरु (काँग्रेस) पिछाडीवर

  6. कतारगाम गोपाल इटालिया (आप) पिछाडीवर

  7. वडगाम जिग्नेश मेवाणी (काँग्रेस) पिछाडीवर

  8. गांधीनगर दक्षिण अल्पेश ठाकोर (भाजपा) आघाडीवर

  9. मोरबी कांतिलाल अमृतिया (भाजप) आघाडीवर

  10. भावनगर पश्चिम जीतेंद्र भाई ऊर्फ जीतू वाघाणी (भाजपा) आघाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.