मागील काही दिवसांपासून गुजरात निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलं होत. भाजप, कॉंग्रेस आणि आप या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. दरम्यान 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल मतमोजणीच्या दिवशी, 8 डिसेंबर रोजी येतील, परंतु मतदानाचा अंतिम टप्पा संपत असताना, वेगवेगळे वृत्तवाहिन्या आणि पोल घेणाऱ्या कंपन्यानी त्यांचे एक्झिट पोलचे अंदाज जारी कले आहेत.
हे एक्झिट पोल सहसा मतदानाचा ट्रेंड काय आहे याचे सूचक म्हणून पाहिले जातात. काहीवेळा हे एक्झिट पोलचे अंगाज अंतिम निकालाच्या जवळ जाणारे देखील असतात. परंतु इतर प्रसंगी, ते चुकीचे देखील ठरले आहेत. त्यामुळे गेल्या काही गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोल कितपत बरोबर आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
2017 मध्ये एक्झिट पोल योग्य ठरले का?
2017 साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेले एक्झिट पोल हे बऱ्यापैकी योग्य ठरले होते. Axis MyIndia यांनी व्यक्त केलेला अंदाज अंतिम निकालाच्या जवळ जाणारा होता. तर जन की बात, सीएसडीएस आणि सीएनएक्स या सर्वांनी भाजपची संख्या जास्त सांगितली होती. यामध्ये भाजप 10 पेक्षा जास्त जागांनी मागं राहिले. तर मतमोजणीच्या वेळी काँग्रेसबद्दल एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेला अंदाज मिळालेल्या जागांच्या जवळपास जाणारा होता.
2012 मध्ये एक्झिट पोल योग्य ठरले का?
2012 साली झालेल्या गुजरात निवडणुकीच्या वेळी देखील बहुतेक एक्झिट पोल हे योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले होते . CVoter चा एक्झिट पोल खूपच जवळ जाणारा होता, निकालाबाबत यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले. ORG चा एक्झिट पोल देखील योग्य ठरला. चाणक्यने मात्र भाजपच्या कामगिरीबद्दल त्यांना अधिक जागा मिळण्याचा दावा केला होता. तथापि, मतमोजणीच्या दिवशी काँग्रेससाठीचे अनेक एक्झिट पोलचे अंदाज वास्तविक आकडेवारीच्या जवळपास जाणारे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.