Gujarat Election Result 2022: मागच्या निवडणुकीने जन्म दिलेल्या युवा नेत्यांचं आज काय झालं?

Gujarat Election Result
Gujarat Election Resultesakal
Updated on

Gujarat Assembly Election Result 2022

२०१७मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचं नाव देशभर गाजलं ज्यांनी काँग्रेससाठी जिवाचं रान केलं, त्यांची यावळेच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे, ते पाहूया.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले युवा नेते हार्दिक पटेल वीरमगाम मतदारसंघामधून उभे होते. पाटीदार नेते म्हणून हार्दिक यांची ओळख आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान ही लढत चर्चेत होती. हार्दिक पटेल यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला आहे.

जिग्नेश मेवाणी हे गुजरातच्या वडगाम मतदारसंघामधून उभे होते. अत्यंत टफ झालेल्या या निवडणुकीत साधारण चार हजार मतांनी मेवाणी विजयी झाले. २०१७मध्ये मेवाणी हे अपक्ष उमेदवार होते. तेव्हाही ते विजयी झालेले. वडगाम मतदारसंघातून मेवाणी यांची मणिभाई वाघेला यांच्याशी लढत झाली. शिवाय आपचे भाटिया हेही मैदानात होते. त्यामुळे ही लढत रंजक झाली. मेवाणी यांना ६९ हजार ८०१ मतं मिळाली.

हेही वाचाः Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अल्पेश ठाकोर यांचा विजय झाला आहे. त्यांना १ लाख ३३ हजार ३३९ मतं मिळाली. पन्नास टक्क्यांच्या वर त्यांनी मतं घेतली आहेत. काँग्रेस उमेवदार डॉ. हिमांशू पटेल यांना ९० हजार १७ मतं मिळालेली आहेत. अल्पेश ठाकोर हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत.

२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत या तीन नेत्यांनी भाजपला जेरीस आणलं होतं. त्यांच्यामुळे काँग्रेसला ७७ जागांवर विजय मिळाला. यावेळी मात्र काँग्रेस १६ जागांवर अडून बसलं आहे. तर भाजपने १५८च्या पुढे आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()