गुजरात ATS ला मोठे यश; 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक

गुजरात पोलिसांनी अलीकडेच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे.
Gujrat ATS
Gujrat ATSSakal
Updated on

अहमदाबाद : मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या (Mumbai 1993 Serial Blast) बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात एटीएसला (Gujrat ATS) मोठं यश आले आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात एटीएसने चार जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी चार आरोपींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. (Gujrat ATS Arrested Four Accused In 1993 Bombay Blast Case)

अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजस्थानमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, एकाला अटक

दरम्यान, गुजरात पोलिसांनी अलीकडेच राजस्थानमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याप्रकरणी अकिफ नाचन नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. यापूर्वी या मॉड्यूलशी संबंधित सात जणांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) राजस्थान पोलिसांकडून या प्रकरणाचा ताबा घेतला आहे. दहशतवादी मॉड्यूलमधील आरोपींवर बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.