टीम भुपेंद्र पटेल, पाहा गुजरातचं नवे मंत्रिमंडळ

विजय रुपानी (vijay rupani) यांना हटवून त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Bhupendra Patel
Bhupendra PatelTeam eSakal
Updated on

अहमदाबाद: गुजरातमध्ये (gujarat govt) मोठे राजकीय फेरबदल झाले आहेत. मागच्या आठवड्यात विजय रुपानी (vijay rupani) यांना हटवून त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. दोन दिवसांपू्वी भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी संपन्न झाला. अंतर्गत मतभेदांमुळे अन्य मंत्र्यांच्या शपथविधीला विलंब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आज सकाळी राजेंद्र त्रिवेदी यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी अन्य चार मंत्र्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. पुढच्यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपाने नव्या सरकारचा पूर्णपणे मेक ओव्हर केला आहे. विजय रुपांनी यांच्या मंत्रिमंडळात असलेले २३ चेहरे बदलले आहेत.

Bhupendra Patel
नुसरतच्या मुलाच्या बाबांचं नाव समजलं! : रजिस्ट्रेशन डिटेल व्हायरल

जाणून घ्या नव्या मंत्र्यांबद्दल

कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, नरेश पटेल, प्रदीपसिंह परमार आणि अर्जुनसिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

मुकेश पटेल, निमीषा सुतार, अरविंद राईयानी, कुबेर दिंडोर आणि किरीटसिंह वाघेला यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Bhupendra Patel
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द

- किरीट सिंह राणा - लिमडी विधानसभेतून आमदार- दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. -२००७-२०१४ वन आणि पर्यावरण मंत्री

- नरेश पटेल- गणदेवी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार-भाजपा राष्ट्रीय आदिवासी मोर्चाचे सचिव

- मोहनभाई डोडिया - महुआ सूरत विधानसभा मतदारसंघातून आमदार

- मनीषा वकिल- वडोदरा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार

-बृजेश मेरजा - काँग्रेसमधून भाजपात प्रवेश - पोटनिवडणुकीत विजय - मोरबी विधानसभा मतदरासंघातून आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.