Building Collapse: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! 6 मजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

Building Collapse: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ही इमारत केवळ 8 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु खराब स्थितीमुळे अनेक फ्लॅट्स रिकामे होते.
Building Collapse
Building Collapse
Updated on

गुजरातमधील सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, मात्र ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू केले आहे. मृतांचा आकडा 7 वर पोहोचला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

8 वर्षे जुनी इमारत

ही इमारत केवळ 8 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु खराब स्थितीमुळे अनेक फ्लॅट्स रिकामे होते. इमारत कोसळली तेव्हा पाच कुटुंब इमारतीत राहत होते. त्यामुळे अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

Building Collapse
Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवू - राहुल गांधी

पाऊस हे सर्वात मोठे कारण?

अद्यापपर्यंत त्या लोकांकडून कोणतीही माहिती मिळालेली नसून, वेगाने ढिगारा हटविण्यावरच भर दिला जात आहे. गुजरातमधील सुरतमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक इमारतींचा पाया खचला आहे. आता सुरतमधील ही इमारत का कोसळली याचे खरे कारण कळू शकले नाही, मात्र सततचा पाऊस हाही एक कारण मानला जात आहे.

Building Collapse
Electoral Bonds: राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँडमधून मिळालेल्या देणग्या जप्त केल्या जाणार? पुन्हा एकदा प्रकरण पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात

गुजरातमध्ये हवामान कसे आहे?

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांशी संपर्क तुटला आहे, वीजपुरवठा खंडित झाला असून लोकांना जगणे कठीण झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील लोकांना या पावसापासून दिलासा मिळणार नसून, आणखी काही दिवस मुसळधार पावसासाठी तयार राहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.