Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भयानक अपघात! 70 प्रवासी असलेली बस कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Gujarat Bus Accident Update: बस रविवार सकाळी सूरत चौक बाजारातून सापुताराच्या दिशेने निघाली होती आणि सापुतारा भ्रमण करून परत सूरतकडे जात होती.
Gujarat Bus Accident
Gujarat Bus Accidentesakal
Updated on

गुजरातच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ सापुतारा घाटावर रविवार दिनांक ६ जुलै रोजी एक मोठा अपघात घडला. सूरत येथून आलेली एक बस घाटीत कोसळली. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अंदाजे ७० प्रवासी बसमध्ये होते. अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

बस रविवार सकाळी सूरत चौक बाजारातून सापुताराच्या दिशेने निघाली होती आणि सापुतारा भ्रमण करून परत सूरतकडे जात होती. दरम्यान, ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस सुरक्षा भिंतीला धडकून घाटात कोसळली.

या अपघातामुळे सापुताराच्या पर्यटनाच्या वेळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना सापुताराच्या २ किमी अंतरावर सापुतारा-मालेगाम राष्ट्रीय महामार्गावर घडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "पर्यटकांनी भरलेली बस सायंकाळी सुमारे ५ वाजता सुरक्षा भिंतीला धडकून उलटली, ज्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला." बस सापुतारा घाटातून सूरतकडे परतत असताना हा अपघात घडला.

Gujarat Bus Accident
महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

अपघातानंतर सापुतारा पोलीस आणि आपत्कालीन सेवा त्वरित घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरू केले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात हलवले जात आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील तपासासाठी अधिकारी आणि पोलीस कार्यरत आहेत.

Gujarat Bus Accident
Jagannath Rath Yatra 2024: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.