Gujarat : धार्मिक झेंड्यावरून हिंदू-मुस्लिम गटांत तुफान हाणामारी; 40 जणांना अटक

हिंदू समाजानं धार्मिक ध्वजावर आक्षेप घेतला आहे.
Vadodara Gujarat Violence
Vadodara Gujarat Violenceesakal
Updated on
Summary

हिंदू समाजानं धार्मिक ध्वजावर आक्षेप घेतला आहे.

वडोदरा : वडोदरामधील (Vadodara Gujarat) सावली शहरातील भाजी मंडईत वेगवेगळ्या धर्माच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आलीय. इथं दोन गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. दगडफेकीमुळं तिथं उभ्या असलेल्या वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.

सोमवारी झालेल्या चकमकीनंतर, गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) 40 जणांना अटक केलीय. एएनआय वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. खेडा येथील उंढेला गावात सोमवारी रात्री नवरात्रोत्सवादरम्यान दगडफेकीची ही घटना उघडकीस आली. वडोदरा ग्रामीण पोलीस पीआर पटेल यांनी सांगितलं की, मुस्लिमांचा सण जवळ आला आहे. त्यामुळं स्थानिक लोकांच्या एका गटानं इलेक्ट्रॉनिक खांबावर धार्मिक झेंडे बांधले होते आणि जवळच एक मंदिर होतं. त्यामुळं हिंदू समाजानं धार्मिक ध्वजावर आक्षेप घेत त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं आहे.

Vadodara Gujarat Violence
TRS : मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

यानंतर दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत तिथं उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. शनिवारी रात्री उशिरा दोन्ही गटांकडून क्रॉस एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतर भारतीय दंड संहितेनुसार दंगल पसरवणं, बेकायदेशीर सभा इत्यादी प्रकरणी 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या 25 आणि 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दगडफेकीत 6 जण जखमीही झाले आहेत.

Vadodara Gujarat Violence
Court : झाशीत 8 विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा; रस्त्यावरून ओढत नेत मुलीवर केला होता सामूहिक बलात्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.