निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; प्रवक्ते जयराजसिंह यांचा राजीनामा

Gujarat Congress spokesperson Jayaraj Singh Parmar
Gujarat Congress spokesperson Jayaraj Singh Parmaresakal
Updated on
Summary

गेल्या 10 वर्षांपासून मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आलं. मात्र, मी कधीही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली नाही.

गुजरात काँग्रेसचे (Gujarat Congress) प्रवक्ते जयराजसिंह परमार (Jayaraj Singh Parmar) यांनी आज (गुरुवार) पक्षाचा राजीनामा दिला. परमार यांनी आरोप करत म्हंटलंय की, पक्षानं बऱ्याच काळापासून मला बाजूला केलं आणि काही निवडक नेत्यांनाच जवळ केलं. जे कोणतीच निवडणूक जिंकून देऊ शकत नाहीत. गुजरातमधील सत्ताधारी भाजपात सामील होतील, अशी अटकळ असताना परमार म्हणाले, अजून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरलेलं नाही. मात्र, लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश असेल, असं त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election) होणार आहेत. त्यामुळं काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.

आपल्या फेसबुक पेजव्दारे परमार यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, गुजरात काँग्रेसमध्ये मोठा गदारोळ सुरु असून कोणालाही सन्मान दिला जात नाहीय. गेल्या 10 वर्षांपासून मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आलंय. मात्र, मी कधीही याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली नाही. मी पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलो; पण मला काय मिळालं? पक्षात माझा वारंवार अपमानचं केला गेला.

Gujarat Congress spokesperson Jayaraj Singh Parmar
'माझ्या कुटुंबानं पक्षासाठी रक्त सांडलंय, मी कदापि काँग्रेस सोडणार नाही'

परमार पुढे म्हणाले, मी 2007, 2012, 2017 आणि 2019 मध्ये मेहसाणा येथील खेरालू विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितलं होतं. परंतु, मला तिकीट नाकारलं गेलं. असं असूनही मी पक्षाशी कायम एकनिष्ठच राहिलो. पक्ष आपल्या कार्यपद्धतीत बदल करायला तयार नाही, त्यामुळं माझ्याकडं पक्ष सोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. म्हणून मी राजीनामा दिला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.