Gujarat court : 'गायीच्या शेणापासून बनवलेली घरे Atomic Radiation पासून सुरक्षित'

सर्रासपणे सुरू असलेल्या गोहत्येवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली
Gujarat court
Gujarat courtesakal
Updated on

गोहत्या बंद झाल्यास पृथ्वीवरील अनेक समस्या सुटतील. गाईच्या शेणापासून बनवलेल्या घरांवर अणुकिरणांचाही काही परिणाम होत नाही, असे मत तापी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश समीर विनोदचंद्र व्यास यांनी व्यक्त केले आहे.

गाईचे आपल्या रोजच्या जीवनात अनेक फायदे आहेत. अनेक असाध्य रोगांवर गोमूत्र प्रभावी ठरते, असेही ते म्हणाले. 68 कोटी तीर्थक्षेत्रे आणि 33 कोटी देव-देवता गाईत वास करतात. त्यामूळेच हिंदू धर्मात गायीला महत्त्व आहे.

Gujarat court
Cow Milk Color : गायीचं पिवळं अन् म्हशीचं दूध पांढरं का असतं?

असे असले तरी सर्रासपणे सुरू असलेल्या गोहत्येवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. अहवालानूसार, नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने गायींच्या रक्षणासाठी सरकारी अधिकाऱ्यांना सतर्क राहत काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. पण, प्रशासनाने  यासंबंधीची कोणतीही कारवाई केली नसल्याने न्यायाधीशांनी असंतोष व्यक्त केला होता.

Gujarat court
BBC Gujrat Documentry : बीबीसीचा ‘गुजरात' माहितीपट हा निव्वळ दुप्रष्चार

गाय हा केवळ प्राणी नसून माता आहे, असे मानले जाते. आणि विविध श्लोकांची उदाहरणे देत न्यायालयाने सांगितले की, गायीला दुखापत झाल्यास त्याचा तुमच्या संपत्तीवर वाईट परिणाम होतो, असेही न्यायाधीश समीर विनोदचंद्र व्यास म्हणाले.

Gujarat court
Madras High Court Decision : "हिंदू पुराणांमध्ये नवऱ्याच्या कुटुंबासाठी त्याग करणारी स्त्री देवासमान"

न्यायमूर्ती म्हणाले की, आज वातावरणात झालेल्या बदलालाही गोहत्याच कारणीभूत आहेत. आपण पृथ्वीचा समतोल राखला पाहिजे. त्यासाठी गायींची हत्या थांबवली पाहिजे, तरच वाढत्या प्रदुषणाची समस्या संपेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()