Asaram Bapu: आसाराम बापूची शिक्षा स्थगित होणार? हायकोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी

Asaram Bapu: स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Asaram Bapu
Asaram BapuEsakal
Updated on

Asaram Bapu: स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण 2013 च्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे. आसाराम बापूचे वाढते वय पाहता न्यायालयाने याचिकेवर सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आसाराम बापू जवळपास एक दशकापासून तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची वस्तुस्थितीही न्यायालयाने विचारात घेतली आहे. 4 एप्रिलपासून न्यायालयात त्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे.

न्यायमूर्ती एएस सुपेहिया आणि न्यायमूर्ती विमल व्यास यांच्या खंडपीठासमोर आसाराम बापूच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी बलात्काराच्या शिक्षेविरोधातील त्याच्या अपीलावर सुनावणी घेण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले. न्यायमूर्ती सुपाहिया म्हणाले, "त्यानी 10 वर्षे तुरुंगात घालवली आहेत आणि ते आता 85 वर्षांचे आहेत. शिक्षा स्थगित करण्याच्या त्याच्या याचिकेऐवजी आम्ही मुख्य अपीलावरच सुनावणी करू."

Asaram Bapu
Loksabha Election: प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद

न्यायालयाने म्हटले की, "मुख्य अपील आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी कालमर्यादा आहे. अशा परिस्थितीत आम्ही 4 एप्रिलपासून मुख्य अपीलावर सुनावणी करू." उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी अपीलची सुनावणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, जेणेकरून आम्ही सुट्ट्यांनंतर निर्णय देऊ शकू, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आसाराम बापूला जानेवारी 2023 मध्ये सुरत आश्रमात अनेक वेळा त्यांच्या शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या एका ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले होते. आसाराम बापूवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३५४ (महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणे), ३४६ (चुकीने बंदिस्त करणे), १२०बी (गुन्हेगारी कट) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषी ठरवण्यात आले आहे.

Asaram Bapu
Supreme Court on Electoral Bond Numbers: इलेक्टोरल बाँड्सच्या तपशीलासोबत नंबरही उघड करा; सर्वोच्च न्यायालयाचे SBIला निर्देश

अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, पीडितेला आसाराम बापूने सुरत शहराच्या बाहेरील आश्रमात ओलीस ठेवले होते आणि 2001 ते 2006 दरम्यान तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता.

त्याला दोषी ठरवण्यात आलेले हे पहिले प्रकरण नव्हते. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तो आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

Asaram Bapu
Electoral Bonds: 'इलेक्टोरल बाँड्सच्या प्रती परत करा', निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती; काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.