अहमदाबाद : गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांना ट्रायल कोर्टाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2017 मध्ये मेवाणींनी मेहसाणा येथे परवानगीशिवाय रॅली काढली होती. त्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात जिग्नेश यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांनाही तीन महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण 12 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मेवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2017 मध्ये मेहसाणा ते बनासकांठा जिल्ह्यातील धानेरापर्यंत ‘आझादी मोर्चा’ चे नेतृत्व केले होते. (Jignesh Mewani & 12 Others Sentenced To Three months Imprisonment)
न्यायालयाने सर्व दोषींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, मेहसाणा पोलिसांनी जुलै 2017 मध्ये परवानगीशिवाय मेहसाणा ते बनासकांठा जिल्ह्यातील धानेरापर्यंत आझादी मार्च काढल्याबद्दल मेवाणी आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
2017 मध्ये परवानगी न घेता काढला होता आझादी मोर्चा
मोवाणी यांनी 2017 मध्ये परवानगीशिवाय मेहसाणा ते बनासकांठा जिल्ह्यातील धानेरापर्यंत आझादी मोर्चा काढला होता. यामध्ये जिग्नेश मेवाणींसह आणि राष्ट्रवादीचे नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार हेही सहभागी झाले होते. दरम्यान, परवानगी नसतानाही हा मोर्चा काढल्याबद्दल न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवत तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.