Crime News: गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत सेक्स केल्यानंतर अति रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. संतापजनक म्हणजे या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड इंटरनेटवर 'सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्यास काय करावे?'हे सर्च करत होता. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय बॉयफ्रेंडला निष्काळजीपणा करणे आणि गर्लफ्रेंडला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन न जाणे या कारणासाठी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉयफ्रेंडने तात्काळ तिला ह़ॉस्पिटलमध्ये नेलं असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. पोलिसांच्या माहितीनुसार, बॉयफ्रेंड ६० ते ९० मिनिट ऑनलाईन उपाय शोधण्यात व्यस्त होता.
गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातीत ही घटना आहे. बॉयफ्रेंडने रुग्णवाहिकेला फोन करण्यापेक्षा मित्राला फोन करणे पसंत केलं. तरुणीचा रक्तस्त्राव जास्त होत होता, तरी तो ऑनलाईन उपाय शोधण्यात व्यस्त होता. त्याने काही वेळ कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने काही झालं नाही. काही वेळाने तरुणी बेशुद्ध पडली.
तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर बॉयफ्रेंडने मित्राला फोन करून हॉटेलवर बोलावून घेतले. त्याने देखील कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध तरुणीला त्यानंतर खासगी वाहनातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेत असताना बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना फोन केला. पण, ते जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. योनी फाटली आहे आणि अति रक्तस्त्राव झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख तीन वर्षांपूर्वी झाली होती, पण ते दोन वर्षांपासून संपर्कात नव्हते. त्यानंतर सात महिन्यापूर्वी ते पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.