अहमदाबाद (गुजरात): एक बस पुलाखाली पाण्यात अडकली होती. चालकाने प्रयत्न करूनही ती पुढे अथवा मागे जात नव्हती. शिवाय, बसमध्ये प्रवासी असल्यामुळे सर्वजण अडकून पडले होते. अखेर जेसीबीने बसला बाहेर काढले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजकोट गोंडल पुलाखाल राज्य परिवहनची बस पाण्यात अडकली होती. जेसीबीच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले. उपस्थितांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, जेसीबीचे आकर्शन अनेकांना असते. जेसीबी काम करत असला तरी अनेकजण तेथे थांबून त्याकडे पाहताना दिसतात. शिवाय, व्हिडिओ पाहणाऱयांची संख्याही मोठी आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जागोजागी पाणी तुंबल्याचे दिसत आहे. राज्यात आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय, येत्या 16 व 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात राज्य परिवहन बस अडकली होती. जेसीबीने तिला अलगद बाहेर काढले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.