हेअर ट्रान्सप्लांट नंतर तीन दिवसांनी ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

"१५ सप्टेंबरला दुपारी चार वाजता अरविंद यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरु झाली. रात्री १० वाजेपर्यंत ते क्लिनिकमध्येच होते"
hair loss after corona recovery
hair loss after corona recoveryesakal
Updated on

अहमदाबाद: हेअर ट्रान्सप्लांट (hair transplant) सर्जरीनंतर लगेचच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अरविंद चौधरी (३१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीमुळे अरविंद यांचा अचानक मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. अरविंद मेहसाणा (Mehsana) जिल्ह्यातील विसानगर तालुक्यातील खादोसान गावचे रहिवासी होते. विसानगरमध्ये ते वाचनालय चालवत होते. १५ सप्टेंबरला ते मेहसाणामधील जेल रोडवरील हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकमध्ये गेले होते.

"१५ सप्टेंबरला दुपारी चार वाजता अरविंद यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरु झाली. रात्री १० वाजेपर्यंत ते क्लिनिकमध्येच होते" असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने सांगितले. रात्री क्लिनिकमधून बाहेर पडताना अरविंद चौधरी पूर्णपणे स्वस्थ होते. घरी जाण्याआधी चौधरी यांनी खाद्यपदार्थांचेही सेवन केले. १७ सप्टेंबरला सकाळी अरविंद चौधरी क्लिनिकमध्ये गेले. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

hair loss after corona recovery
गर्भवतीच्या हत्याकांडाने खळबळ, मित्राच्या घरी सापडला मृतदेह

"डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला" असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकशी संबंधित असलेल्या रुग्णालयात ते दाखल झाले. प्रकृती आणखी खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. १८ सप्टेंबरला रात्री ७.३० च्या सुमारास त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. चौधरी यांच्या कुटुंबाने हेअर ट्रान्सप्लांटच्या उपचारांमध्ये दुर्लक्ष झाल्याचा आणि रुग्णालयाने व्यवस्थित काळजी न घेतल्याचा आरोप केला आहे. हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करावा अशी कुटुंबाची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.