H3N2 Virus : कोरोनानंतर नवं संकट; हरियाणा, कर्नाटकनंतर 'या' राज्यात H3N2 विषाणूनं घेतला पहिला बळी

सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगानं पसरत आहे.
H3N2 Virus
H3N2 VirusSakal
Updated on
Summary

या विषाणूमुळं हरियाणा आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

H3N2 Virus : सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगानं पसरत आहे. आता या व्हायरसमुळं देशात तिसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमधील वडोदरा इथं हा मृत्यू झाला आहे.

उपचारादरम्यान 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेला आधीच अनेक आजार होते. ती उच्च रक्तदाबाची रुग्ण होती आणि व्हेंटिलेटरवर होती.

या विषाणूमुळं हरियाणा आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीपासून देशातील विविध राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. डॉक्टरांच्या मते, H3N2 हा इन्फ्लूएंझा ए (Influenza Virus) चा उपप्रकार आहे, जो यावेळी खूप सक्रिय झाला आहे.

H3N2 Virus
Nepal President : नेपाळची धुरा आता 'रामा'च्या हाती; पौडेल यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

या विषाणूनं त्रस्त रूग्णांमध्ये सर्दीची लक्षणं दिसून येत असली तरी हळूहळू हा विषाणू रूग्णाच्या फुप्फुसात पोहोचतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 5 वर्षांखालील मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते.

H3N2 Virus
Karni Sena : 'जोधा अकबर' चित्रपटाला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या संस्थापकांचं निधन

अशा रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास त्यांचा जीवही जाऊ शकतो. जर तुम्ही डॉक्टरांशी सहमत असाल तर या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका. रुग्णाला तातडीनं रुग्णालयात घेऊन या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.