गुजरातमध्ये दर्ग्यावरून मोठा गोंधळ, पोलिसांवर हल्ला, दगडफेक अन् जाळपोळ, एकाचा मृत्यू DCPसह अनेक जण जखमी

दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारीही जखमी
Gujrat news
Gujrat news Esakal
Updated on

गुजरातमधील जुनागढ येथील दर्गा हटवण्याच्या नोटीसवरून काल शुक्रवारी संध्याकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला. दर्गासमोर शेकडो लोक जमले आणि घोषणाबाजी करत त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत डेप्युटी एसपीसह चार पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या घटनेमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे.(Latest Marathi News)

दर्ग्यावर गोंधळ घालणाऱ्या आणि चार पोलिसांना जखमी करणाऱ्यांमध्ये संबधित आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना दर्ग्यासमोर उभे करून बेल्टने बेदम मारहाण केली.

काय आहे संपुर्ण प्रकरण

जुनागडमधील माजेवाडी गेटसमोर रस्त्याच्या मधोमध एक दर्गा बांधण्यात आली आहे. तो हटवण्यासाठी महापालिकेच्यावतीने वरिष्ठ नगररचनाकारांना नोटीस बजावण्यात आली होती. हे धार्मिक स्थळ बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे नोटीसमध्ये लिहिले होते.(Latest Marathi News)

Gujrat news
Nitin Gadkari: गडकरींच्या मागणीला मिळाला ग्रीन सिग्नल; वारकऱ्यांना मोठा दिलासा

पाच दिवसांच्या आत या धार्मिक स्थळाच्या कायदेशीर वैधतेचे पुरावे सादर करावेत, अन्यथा हे धार्मिक स्थळ पाडण्यात येईल आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. धार्मिक स्थळ (दर्गा) पाडण्याची नोटीस लावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले होते. नोटीस वाचताच काही समाजकंटक जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्यांनी पोलीसांवर हल्ला केला.(Latest Marathi News)

संध्याकाळी सात वाजल्यापासून लोक जमू लागले आणि नऊ वाजेपर्यंत 200-300 लोक दर्ग्याभोवती जमले. पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक सुरू केली आणि पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक डेप्युटी एसपी आणि तीन पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस संपूर्ण शहरात कसून चौकशी करत आहेत.(Latest Marathi News)

Gujrat news
Devendra Fadnavis: पुण्यात राष्ट्रवादीने लावले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर, केली ही मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असून, संपूर्ण जुनागड शहरात शेकडो पोलिस तैनात करण्यात आले आहेत. जुनागडचे एसपी रवी शेट्टी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, 'माजेवाडी रोडजवळ एका रस्त्यावर एक दर्गा आहे. महापालिकेने पाच दिवसांपूर्वी त्या दर्ग्याला नोटीस बजावली होती की, त्यावर कोणाचा दावा असेल तर त्यांनी तो महापालिकेत मांडावा. या नोटिशीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी काल (शुक्रवारी) 500-600 लोक तेथे जमले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुरू केला.(Latest Marathi News)

यानंतर पोलिस तेथे पोहोचले ज्यात डीएसपी हितेश यांच्यासह इतर पोलिसांचा सहभाग होता. तासाभराहून अधिक काळ जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागून कोणीतरी दगडफेक करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले.(Latest Marathi News)

Gujrat news
Sharad Pawar: "गुजराल नाही, तर शरद पवारचं झाले असते देशाचे पंतप्रधान", मोठ्या नेत्याने सांगितला १९९६ मधील किस्सा

जखमी पोलिसांची माहिती देताना एसपी रवी शेट्टी म्हणाले, 'डीएसपी हितेश यांना चार टाके पडले आहेत, तीन कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत, तर दोन पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी रात्रभर तेथे शोध घेतला आणि आम्ही 174 आरोपी आणि संशयितांना ताब्यात घेतलं आहे. आम्ही आणखी व्हिडिओ तपासत आहोत आणि सर्व आरोपींना अटक करू. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जुनागड शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ही दुर्दैवी घटना आहे जी घडायला नको होती असंही ते यावेळी म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.