Gujrat Election 2022: RSS ने अब्रु वाचवली! मोदींच्या गावात इज्जत होती पणाला

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूकांचे निकाल आता समोर आले आहेत. जवळपास भाजपनं बऱ्याच ठिकाणी विजय मिळवला आहे.
Gujrat Election 2022
Gujrat Election 2022esakal
Updated on

Gujrat Assembly Election 2022: गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूकांचे निकाल आता समोर आले आहेत. जवळपास भाजपनं बऱ्याच ठिकाणी विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये तर भाजपचा एकतर्फी विजय मिळवला आहे. ज्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते त्या राज्यातील निवडणूक चर्चेत आली आहे. त्याला कारण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.

वडनगर हे मोदी यांचे गाव तर मानसा हे अमित शाह यांचे गाव. या गावामध्ये काही झालं तरी कमळ फुलणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. मात्र परिस्थिती अशी झाली की काय होईल सांगता येत नाही. असे चित्र होते. अशावेळी भाजपचे थिंक टँक असणाऱ्या आरएसएसनं कशाप्रकारे भूमिका पार पाडली याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मोदींच्या गावात चित्र किती अवघड होते हे ऐकल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला होता.

काही झालं तरी वडनगरमध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवायचा होता. त्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकदम टाईट फिल्डिंग लावली होती. त्यामुळे भाजप विजयी होणारच असे चित्र होते. त्याला आणखी एक वेगळे कारण होते. ते म्हणजे ज्या जागेवर ती निवडणूक होत होती तिथे दोनवेळा कॉग्रेस विजयी झाली होती. त्यामुळे यावेळी कोणताही धोका भाजपाला पत्करायचा नव्हता. आता त्या दोन्ही गावातून किरीट पटेल आणि जयंती भाई पटेल यांनी मानसामधून विजय मिळवला आहे. त्यांच्यावर आता कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

यंदा वडनगरच्या विधानसभा निवडणूकीत बीजेपीकडून किरीट कुमार केशवलाल पटेल यांना तिकीट देण्यात आले होते. पटेल यांना आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचे निकटवर्तीय मानले जाते. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग हा सुकर झाल्याचे बोलले जाते. यावेळच्या निवडणूकीमध्ये आरएसएसच्या रणनीतीची भूमिका महत्वाचे राहिल्याची चर्चा आहे. त्यांच्याविना मोदींच्या गावात कमळ फुलले. असे नेटकरी म्हणू लागले आहेत. दुसरं म्हणजे भाजपची जी इज्जत पणाला लागली होती आरएसएसनं वाचवल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत.

Gujrat Election 2022
Uttar Pradesh By Election: 'माझी डिंपल जिंकणार'! पतीदेव अखिलेश यांचा दावा

आरएसएसच्या स्वयंसेवकांनी भाजपच्या त्या दोन्ही नेत्यांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. भलेही १९९५ पासून त्या जागी भाजप विजयी होत होती. मात्र कॉग्रेसनं दोनवेळा भाजपला दणका दिला होता. तेव्हा पासून भाजपनं त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्ण तयारी केली होती.

Gujrat Election 2022
Ram Gopal Varma: रामभाऊ अभिनेत्रीचे पाय चाटायचेच बाकी राहिले! किसिंग करत सुटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.