Narendra Modi : पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; रात्री उशिरा ATS नं घेतलं ताब्यात

रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं.
Threat to PM Narendra Modi
Threat to PM Narendra Modiesakal
Updated on
Summary

रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं.

Threat to PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना (Aman Saxena) या तरुणाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणात एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचं नाव समोर आलं होतं. गुजरात एटीएस (Gujarat ATS) या सर्वांचा शोध घेत होती.

रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकानं अमनला ताब्यात घेतलं. गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएन बघेला हे पथकासह रात्री दहाच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात गुजरातमधील एक तरुण आणि तरुणीचं नाव पुढं आलं. त्यानंतर एटीएस सक्रिय झाली. संयुक्त पथक तिन्ही आरोपींचा शोध घेत होतं.

Threat to PM Narendra Modi
Baba Ramdev : स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता; महिलांबाबत वादग्रस्त बोलणाऱ्या बाबा रामदेवांचा यू-टर्न?

दरम्यान, अमनचं लोकेशन ट्रेस होताच हे पथक रात्री शहरात पोहोचलं. आरोपी अमन सक्सेना हा काही काळापूर्वी राजर्षी कॉलेज, बरेली इथं अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. परंतु, त्यानं ते शिक्षण अपूर्ण सोडलं. आरोपींनी कोणत्या उद्देशानं धमकी दिली, याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक बघेला यांनी इतर दोन आरोपींबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()