गुजरात मॉडेलचा बुरखा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकसंदेशाने

विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कोरोना मृतांचा खरा आकडा दाबत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गुजरात मॉडेलचा बुरखा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकसंदेशाने
Updated on
Summary

विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कोरोना मृतांचा खरा आकडा दाबत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस किती वाढते आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त एकच करा आणि ते म्हणजे स्थानिक वृत्तपत्रे उघडून त्यातील शोकसंदेशाच्या जाहिराती बघा. दिवसागणिक या स्तंभातील जाहिराती आणि त्याचबरोबर त्यासाठीच्या पानांची संख्याही वाढत आहे. यावरून मृतांची आणि प्रामुख्याने कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे नोंदली जात नसल्याचे स्पष्ट होते.

विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कोरोना मृतांचा खरा आकडा दाबत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकार लोकांपासून वस्तुस्थिती लपवीत आहे. अनेक खेड्यांत मृतांची संख्या दोन अंकांपेक्षा म्हणजे दहा पेक्षा जास्त आहे. तेथील सरकारी आकडा मात्र एकेरीत आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी केला आहे. सरकारने मात्र यास प्रत्यूत्तर देताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांचा निकष पुढे केला आहे. गुंतागुंतीचे आजार झालेला रुग्ण कोविड संसर्गामुळे दगावला तर त्याची गणना कोरोना मृतांमध्ये केली जात नाही असे स्पष्ट करण्यात आले.

गुजरात मॉडेलचा बुरखा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकसंदेशाने
मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे?

न्यायालयाचे ताशेरे

बुधवारी गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. कोरोना निर्मूलनासाठी सरकार करीत असलेली उपाययोजना पुरेशी नसून लोकांच्या कल्याणासाठी आणखी निर्बंध लादण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.

दृष्टिक्षेपात

- सौराष्ट्र भास्करच्या भावनगर आवृत्तीत गुरुवारी १६ पैकी निम्मी म्हणजे आठ पाने शोकसंदेशाच्या जाहिरातींसाठी

- सौराष्ट्र भास्कर वृत्तपत्रात गुरुवारी शोकसंदेशाच्या २३८ जाहिराती, दोन महिन्यांपूर्वी सहा मार्च रोजी हाच आकडा केवळ २८

- संदेश वृत्तपत्रानुसार बुधवारी खेडा जिल्ह्यात १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, अधिकृत सरकारचा आकडा मात्र केवळ दोन

- गुजरात समाचारच्या वृत्तानुसार गांधीनगरमध्ये गुरुवारी २५ कोरोना रुग्ण दगावले, अधिकृत आकडा मात्र शून्य

- सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत कोरोना मृतांचा आकडा १३३ इतका होता. प्रत्यक्षात गुरुवारी शोकसंदेशाच्या जाहिरातींची गुजरात समाचारमधील संख्या ८५, तर संदेशमधील ५६ अशी एकूण १४१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()