गुजरात, दिल्ली महापालिकेसाठी भाजपचा गेम प्लॅन !

आरोप प्रत्यारोपांच्य गदारोळात भाजपने गृहमंंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुकांसाठीची रणनीती आखली
gujrat delhi municipal corporation election bjp aap arvind kejriwal Sheila Dikshit
gujrat delhi municipal corporation election bjp aap arvind kejriwal Sheila Dikshitsakal
Updated on
Summary

आरोप प्रत्यारोपांच्य गदारोळात भाजपने गृहमंंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुकांसाठीची रणनीती आखली

आगामी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीची रणधुमाळी अवघा महिन्यावर आली असताना महापालिकेतील आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि सत्ताविरोधी अँटी इन्कम्बन्सीवर मात करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा २०१७ प्रमाणे सध्याच्या नगरसेवकांची तिकीटे मोठ्या प्रमाणावर कापण्याची रणनीती आखण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्याच आसपास होऊ घातलेल्या गुजरातच्या निवडणुकीतही भाजप सध्याच्या आमदारांना झटका देऊ शकतो. या दोन्ही ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे मोठे आव्हान ‘महाशक्ती‘ असलेल्या भाजपसमोर आहे. हिमाचल प्रदेशात भाजपला तुलनेने अनुकूल स्थिती असल्याचे भाजप नेते मानतात. यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपला एमसीडीच्या खुर्चीतून बाहेर काढण्यासाठी ‘आप’ ने सारी शक्ती पणाला लावली आहे. गुजरातवर डोळा ठेवून केजरीवाल यांनी नोटांवर देवदेवतांची चित्रे छापा, असा पध्दतीचे कार्ड खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप नेते त्यावरून त्यांच्यावर तुटून पडले. केजरीवाल व ‘आप' ला कोणतीच विचारधारा नाही, वैचारिक बांधिलकीच नाही. त्यामुळे केजरीवाल व कंपनी मनाला वाटेल ते बोलू शकतात, असा हल्ला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे पुत्र संदीप दिक्षीत यांनी चढविला आहे.

आरोप प्रत्यारोपांच्य गदारोळात भाजपने गृहमंंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुकांसाठीची रणनीती आखली व त्यावर अंमलबजावणीही सुरू केली आहे. २०१७ च्या दिल्लीतील निवडणुकीत भाजपने एकाही विद्यमान नगरसेवकाला तिकीट न देऊन मोठी खेळी केली होती, त्यामुळे पक्षाला अँटी इन्कम्बन्सीचा कोणताही फटका बसला नाही आणि मोठा विजय मिळाला. शहा दिल्लीत तोच प्रयोग पुन्हा लावू शकतात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला हे सोशल मीडिया आणि प्रचार समितीचे निमंत्रक असतील. पुनीत अग्रवाल, रोहित उपाध्याय, खेमचंद्र शर्मा, पूजा तिवारी, निखत अब्बास, अपूर्व सिंग आणि तजिंदर पाल सिंग बग्गा हे समितीचे सदस्य असतील. मोदी सरकारने यावर्षी पुन्हा तीन महापालिकांचे दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) विलीनीकरण केले आहे आणि नगरपालिका प्रभागांची संख्या २७२ वरून २५० पर्यंत कमी केली आहे. त्याविरूध्द आपने रान उठविले आहे.

भाजपने निवडणुकीशी संबंधित २१ समित्या कालच स्थापन केल्या आहेत. यात निवडणूक व्यवस्थापन, जाहीरनामा, प्रचार, प्रसारमाध्यमांची खरेदी आणि जाहिरात साहित्य इत्यादींशी संबंधित असतील. या मतदान पॅनेलच्या सदस्यांमध्ये ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. यंदाच्या संभाव्य अँटी इन्कम्बन्सीचा सामना करतानाच काहीही करून महापालिकेची सत्ता वाचवण्यासाठी यावेळीही भाजप नेतृत्व दिल्लीत डागाळलेल्या प्रतिमेच्या नगरसेवकांचीच नव्हे तर आपल्या सर्व विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापण्याचा विचार करू शकते. त्यांच्या जागी भाजप नवीन चेहऱ्यांना किंवा २०१७ मध्ये तिकीटे कापलेल्या पण चांगल्या प्रतिमा असलेल्या माजी नगरसेवकांना दुसरी संधी देऊ शकते, गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीवर भाजपची सत्ता आहे. या काळात इतर कोणत्याही पक्षाला येथे पाय रोवता आलेला नाही. भाजपच्या दिल्लीतील मुख्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जम्मू-काश्मीरचे भाजप नेते आशिष सूद असतील. दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि राजन तिवारी, अनिता आर्य, विशाखा सैलानी आणि आतिफ रशीद हे त्याचे सदस्य असतील. ही समिती इतर समित्यांच्या कामात समन्वय आणि देखरेख ठेवेल. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय हे जाहीरनामा समितीचे निमंत्रक असतील. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बधुडी, दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजेंदर गुप्ता, आमदार अभय वर्मा, राघव अवस्थी आणि रेखा गुप्ता हे सदस्य असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.