Viral Video : निवडणुकीची चर्चा एवढ्या शांततेत? गुजरात, हिमाचल निकालादरम्यान व्हिडिओनं वेधलं लक्ष

गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश निवडणूक २०२२ च्या मतमोजणी सध्या सुरू आहे..
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

1995 Election Coverage Viral Video : गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश निवडणूक २०२२ च्या मतमोजणी सध्या सुरू आहे.. या सर्वामध्ये सोशल मीडियावर १९९५ मधील दूरदर्शनवरील निवडणूक कव्हरेजचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अटल बिहारी वाजपेयी, राजेश पायलट,राम विलास पासवान,जसवंत सिंह, हरकिशन सिंह सुरजीत, पीए संगमा या सारखे दिग्गज नेते एकाच मंचावर अतिशय शांतपणे चर्चा करताना दिसून येत आहेत.

आज निवडणुकांच्या विविध चॅनल्सवर कव्हरेजदरम्यान खूप वाद होताना आपण बघतो. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये नेते आणि अँकर अगदी शांतपणे बसून देशातील समस्यांवर बोलताना दिसून येत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये न्यूज अँकर नलिनी सिंह यांच्यासह काँग्रेस नेते राजेश पायलट दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये पत्रकार नलिनी सिंग १९९५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत दूरदर्शनवर चर्चा करताना दिसत आहेत @darpananilsingh या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून " दूरदर्शनवरील १९९५ च्या निवडणुकीचे कव्हरेज" अशी कॅप्शन देण्यात आली आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभेच्या निकालादिवशीच हा व्हिडिओ समोर आल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video
BJP AAP Deal: गुजरातसाठी भाजपकडून दिल्ली, हिमाचल कुर्बान? वाचा Inside Story

व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यापासून या व्हिडिओला 297.1 हजार व्ह्यूज आणि 4.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याशिवाय शेकडो युजर्सनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. यात एका यूजरने "त्यावेळच्या निवडणुकीच्या चर्चा आजच्यापेक्षा चांगल्या होत्या. " तर, एका यूजरने अच्छे दिन 2014 नंतर आल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.