Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू

शाळेच्या ट्रिपसाठी हे विद्यार्थी गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे.
Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू
Updated on

नवी दिल्ली : गुजरातच्या वडोदऱ्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थी असा एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या ट्रिपसाठी गेले होते. (gujrat vadodara boad capsized 15 died including 10 students and 2 teachers)

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

वडोदरा जिल्ह्यातील हरणी तलावात नौकाविहार करत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये 12 शालेय विद्यार्थ्यांचा आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी काहीजण बेपत्ता आहेत. तर अन्य १३ विद्यार्थ्यांना आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू
Prakash Ambedkar: "भाजप-आरएसएस देवाचा वापर ईव्हीएमसारखा करताहेत"; प्रकाश आंबेडकारांची टिप्पणी

एकानंही घातलं नव्हतं लाईफ जॅकेट

वडोदरा इथल्या 'न्यू सनराईज' शाळेतील विद्यार्थी आज सकाळी हरणी वॉटर पार्क आणि तलावाच्या सहलीसाठी गेले होते. दुपारी इथल्या तलावात नौकाविहार सुरू असताना अचानक नौका उलटली. यावेळी एकाही मुलानं आणि शिक्षकांनी लाइफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यामुळं नौका उलटताच सर्वजण बुडाले. (Marathi Tajya Batmya)

Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू
Karuna Sharma: करुणा शर्मांचे पुन्हा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ठाकरे, चाकणकर, फडणवीस, सुप्रिया सुळेंना घातलं साकडं

क्षमतेपेक्षा अधिक जण बसले होते

या घटनेची माहिती कळताच बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तसेच दोन शिक्षकांचाही मृत्यू झाला. मात्र, बचावपथकाला एकूण 12 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. नौकेत 16 पर्यटकांना बसण्याची परवानगी असताना 27 जण बसले होते, असे जिल्हाधिकारी ए.बी. गौर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.