Vadodara Boat Capsized: नाव दुर्घटनेतील मृतांना अन् जखमींना PM मोदी अन् CM पटेल यांच्याकडून मदत जाहीर

या दुर्घटनेत १३ विद्यार्थ्यांचा तर २ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
PM Modi
PM Modi
Updated on

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा इथं हरणी तळ्यात नाव उलटल्यानं मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणि मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडून मदत जाहीर केली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्याच्या मिळून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

मोदींनी ट्विट करुन दिली माहिती

मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं की, वडोदरातील हरणी तळ्यात बोट पलटल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रती दुःख व्यक्त करतो तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तसेच स्थानिक प्रशासनानं पीडितांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. (Latest Marathi News)

मोदींकडून प्रत्येकी २ लाखांची मदत

मोदींनी पुढे म्हटलं की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करत आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रत्येकी ४ लाखांची मदत

त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी देखील ट्विट करुन मदत जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, वडोदऱ्यातील नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करत आहोत. (Marathi Tajya Batmya)

PM Modi
Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू

नेमकं काय घडलंय?

गुजरातच्या वडोदरा इथं हरणी तलाव परिसरात एका खासगी शाळेची ट्रिप गेली होती. यावेळी या तलवात नौकाविहार करण्यासाठी २७ विद्यार्थ्यांसह काही शिक्षक एकाचवेळी बोटीत बसले. या बोटीत १६ जणांनाच बसण्याची मर्यादा होती. तसेच यांपैकी एकानंही लाइफ जॅकेट परिधान केलं नव्हतं. त्यामुळं अतिओझ्यामुळं ही बोट पलटली आणि त्यात ८ ते १५ वर्षे वयोगटातील १४ विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू झाला तर २ शिक्षकांनाही आपले प्राण गमवावे लागले. नव्या वर्षातील देशात घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.