गया : बिहारच्या गया येथील जगप्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळ असलेल्या महाबोधी विहार परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
या देशातील नागरिकांसह परदेशातील नागरिकही या विहाराला मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. गोळीबाराच्या घटनेनंतर हे विहारातील प्रवेश सध्या बंद ठेवण्यात आला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. (Gun Fired Maha Bodhi Vihar area at Bihar One policeman killed)
सुत्रांच्या माहितीनुसार, बीएसएपी सुरक्षा दलाचा जवान सत्येंद्र यादव (वय ४३) हे या ठिकाणी शुक्रवारी दुपारी ड्युटीवर जात होते. ज्या रस्त्यानं ते जात होते तिथं एका दगडावर त्यांनी पाय ठेवला तो दगड निसरडा असल्यानं तोल जाऊन ते खाली पडले. याचवेळी त्यांच्या हातात असलेल्या बंदुकीतून एकामागून एक अशा तीन गोळ्या सुटल्या. सत्येंद्र यांना स्वतःला एक गोळी लागली. गोळी लागल्यानं ते बेशुद्ध होऊन जमिनीव पडले. (Marathi Tajya Batmya)
कायम देश-विदेशातील भाविकांचा पर्यटकांचा राबता असलेल्या या जगप्रसिद्ध महाबोधी विहाराच्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली. यानंत आसपासच्या लोकांची देखील इथं गर्दी जमायला लागली. यावेळी सूचना मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या गडबडीत जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (Latest Marathi News)
गया जिल्ह्याचे रेंज डीआयजी यांनी या फायरिंगबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, सत्येंद्र यादव या जवानाच्या कार्बाइन या रायफलमधूनच फायरिंग झाली आहे. या ठिकाणी जवळपास कुठलाही सीसीटीव्ही नाही.
बॅलेस्टिक तज्ज्ञ आल्यानंतर ते या प्रकरणाचा तपास करतील. त्यानंतरच खरं कारण समोर येऊ शकेल. घटनास्थळावरुन काही वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत, त्याचीही चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.