मनाली (हिमाचल प्रदेश) : अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या तिच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नेमका प्रकार काय घडला? याविषयी अजूनही संभ्रम असल्याचं स्पष्ट होत आहे. कंगणाने मात्र, आपल्याला धमकावण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला होता, असा आरोप केलाय.
बॉलिवूडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कंगणाने मनाली येथे आपल्या मूळ गावी आलीशान घर बांधले आहे. लॉकडाउननंतर ती त्या घरातच आपल्या कुटुंबियांसह राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या घराबाहेर रात्री गोळीबाराचा आवाज आला होता. याप्रकरणी कंगणाने स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घराबाहेर बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कंगणा काय म्हणाली?
कंगणाचं घर असलेल्या परिसरात सफरचंदाची शेती आहे. रात्रीच्या वेळी वटवाघूळ सफरचंदाच्या शेतीचं नुकसान करतात. त्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेकदा शेतकरी फटाके लावतात. काल, रात्री गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना विचारल्याचं कंगणानं पोलिसांना सांगितलं. तेथील शेतकऱ्यांनी 'आम्ही फटके लावले नाही', असं सांगितल्यानंतर कंगणानं पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार आम्हाला धमकावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप कंगणानं केलाय. आपल्या राजकीय स्पष्टवक्तेपणामुळं हा प्रकार घडला आहे. पण, यापुढंही मी घाबरणार नाही, असं कंगणानं ठामपणे सांगितलंय.
रात्री साडे अकराच्या सुमारास मला फटाक्यांसारखे आवाज ऐकू आले. सुरुवातीला मलाही कोणीतरी फटाके फोडत असल्यासारखेच वाटले. सध्या मनालीमध्ये टुरिस्टही येत नाहीत. त्यामुळं सगळीकडं शांतता असते. त्यामुळं मला शंका आली. मी सुरक्षा रक्षकांना बोलवले. आम्ही घरात पाचजण आहोत. या सगळ्या प्रकारानंतर आम्ही पोलिसांना बोलवले.
- कंगणा राणावत, अभिनेत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.