Ram Rahim Parole : राम रहीमला पॅरोल मिळाला, 40 दिवसांसाठी पुन्हा येणार बाहेर

Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahimesakal
Updated on

नवी दिल्लीः डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. तब्बल ४० दिवसांसाठी राम रहीम तुरुंगाबाहेर येणार आहे.

राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याला पॅरोल मंजूर झाल्याची बातमी कळताच आश्रमामध्ये स्वागताची जंगी तयारी सुरु झालीय.

तीन महिन्यांपूर्वी १४ ऑक्टोबर रोजी गुरमीत राम रहीम याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. २५ नोव्हेंबर रोजी त्याचा पॅरोलचा कालावधी संपला. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशच्या त्याचा बरनावा आश्रमामध्ये गेला होता.

दोन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम शिक्षा भोगत आहे. यापूर्वी हरियाणाचे जेलमंत्री रंजीत सिंह चौटाला यांनी डेरा प्रमुखाच्या पॅरोल याचिकेवर टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, डेरा प्रमुखाने ४० दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला आहे. तो अर्ज विभागीय आयुक्तांना पाठवल्यांचं त्यांनी सांगितलेलं. सूत्रांच्या माहितीनुसार पॅरोल कालावधीमध्ये डेरा प्रमुख माजी डेराप्रमुखांच्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे.

15 ऑक्टोबरला आला होता बाहेर

डेरा प्रमुख राम रहीम 15 ऑक्टोबर 2022 रोजी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. चाळीस दिवस तो बर्नावा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहिला. यावेळी त्याच्यासोबत मुलगी हनीप्रीत आणि इतर कुटुंबीयही होतं. राम रहीमनं डेरामध्ये दिवाळी आणि डेरा संस्थापकाची जयंतीही साजरी केली होती. पॅरोलदरम्यान राम रहीमनं ऑनलाइन सत्संगही केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()