गुरमीत रामरहिम सिंग दोषीच! रणजीत सिंग हत्याप्रकरणी CBI कोर्टाचा निकाल

गुरमीत रामरहिम सिंग दोषीच! रणजीत सिंग हत्याप्रकरणी CBI कोर्टाचा निकाल
Updated on
Summary

रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज शुक्रवारी डेरामुखी राम रहीम सहित पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे.

नवी दिल्ली : रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज शुक्रवारी डेरामुखी राम रहीम सहित पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे. सर्व दोषींना 12 ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावली जाईल. आज शुक्रवारी या प्रकरणातील आरोपी डेरामुखी गुरमीत रामरहिम आणि कृष्ण कुमार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर राहिले तर आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल हे प्रत्यक्ष हजर होते.

गुरमीत रामरहिम सिंग दोषीच! रणजीत सिंग हत्याप्रकरणी CBI कोर्टाचा निकाल
Corona: दिवसाला पाच लाख रुग्ण हाताळण्याची क्षमता; सरकारचा छातीठोक दावा

या प्रकरणी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सगळ्या आरोपींना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने या प्रकरणी पहिला निकाल 26 ऑगस्ट रोजी सुनावला होता. फिर्यादी पक्षाचे वकील एसपीएस वर्मा यांनी सांगितलं की, 19 वर्षे जुन्या प्रकरणामध्ये गेल्या 12 ऑगस्ट रो जी बचाव पक्षाचा अखेरचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. सीबीआयचे न्यायाधीश डॉ. सुशील कुमार गर्ग यांच्यासमोर जवळपास अडच तास युक्तीवाद चालल्यानंतर त्यांना दोषी ठरवलं गेलं.

2003 मध्ये केली होती सीबीआय तपासाची मागणी

10 जुलै 2002 ला डेऱ्याच्या प्रबंधन समितीचे सदस्य राहिलेल्या कुरुक्षेत्र रणजीत सिंह यांचा खून झाला होता. पोलिस तपासाने असमाधानी असलेल्या रणजीतच्या वडिलांनी जानेवारी 2003 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत आरोपींवर खटला दाखल केला होता. 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींवर चार्ज फ्रेम केले होते.

गुरमीत राहरहिमला साध्वींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी यापूर्वीच 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडातील आरोपी म्हणून सुनारिया तुरुंगात तो जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. राम रहिमला याआधी सीबीआयचे न्यायधीश राहिलेल्या जगदीप सिंग यांनी शिक्षा सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.