Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मुंबई एअरपोर्टबाबतच्या आरोपांवर GVK कंपनीचा खुलासा; म्हणे, अदानी ग्रुपने…

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला विकणाऱ्या GVK समूहाने राहुल गांधींनी संसदेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
gvk group vice chairman sanjay reddy on mumbai airport deal with adani group amide rahul gandhi allegations
gvk group vice chairman sanjay reddy on mumbai airport deal with adani group amide rahul gandhi allegations
Updated on

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाला विकणाऱ्या GVK समूहाने राहुल गांधींनी संसदेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी म्हणाले होते की, हे विमानतळ अदानी समूहाला मिळावे यासाठी केंद्र सरकारने सीबीआय आणि ईडी या केंद्रीय संस्थांना GVK समूहावर दबाव आणण्यास भाग पाडले.

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना GVK समूहाचे उपाध्यक्ष संजय रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अदानी समूह किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून कोणताही दबाव नव्हता असे सांगितले आहे.

ते म्हणाले की या कराराच्या एक वर्ष आधीपासून आम्ही गुंतवणुकीच्या शोधात होतो. कारण बंगळुरू विमानतळाच्या अधिग्रहणाच्या वेळी आम्ही घेतलेले कर्ज आमच्यावर थकीत होते. ते कर्ज आम्हाला फेडायचे होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदार शोधत होतो. मग आम्हाला तीन गुंतवणूकदार सापडले जे आमच्या कंपनीत एकत्र पैसे लावण्यास तयार होते.

gvk group vice chairman sanjay reddy on mumbai airport deal with adani group amide rahul gandhi allegations
छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला; पुण्याशी होतं कनेक्शन

मात्र, त्यांनी अनेक अटी आमच्यासमोर ठेवल्या होत्या. करार पुढे जाण्यापूर्वी कोरोना आला. या दरम्यान विमानतळाचा व्यवसाय तीन महिने ठप्प झाला आणि आम्हाला शून्य महसूल मिळाला. त्यामुळे आमच्यावर आणखी आर्थिक ताण आला. अशा परिस्थितीत आम्ही वरील तिन्ही गुंतवणूकदारांना हा करार लवकर पूर्ण करण्यास सांगितले, परंतु तसे होऊ शकले नाही, असे रेड्डी यांनी सांगितले.

gvk group vice chairman sanjay reddy on mumbai airport deal with adani group amide rahul gandhi allegations
Turkey Syria Earthquake : तुर्कीला आतापर्यंत बसलेत 435 झटके! मृतांची संख्या 8 हजारांच्या पुढे

याच सुमारास गौतम अदानी यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला मुंबई विमानतळासाठी इच्छुक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. महिनाभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. रेड्डी म्हणाले, कंपनीसाठी हा करार आवश्यक असल्याने आम्ही हा करार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.