अयोध्या- मुस्लिमांनी आता ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज पढणे सोडून द्यायला हवे. तसेच मंदिर आता हिंदूंना सुपूर्द करायला हवे अशी भूमिका श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्रा दास यांनी घेतली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापी परिसरात केलेला सर्वे सार्वजनिक करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला आहे.(Gyanvapi ASI survey report Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Chief Priest Acharya Satyendra Das says)
शरीयतनुसार, हिंदू धार्मिक स्थळावर मशिद बांधून त्याठिकाणी मुस्लीम नमाज पढू शकत नाहीत. आता स्पष्ट झालंय की ज्ञानवापी परिसरात पूर्वी हिंदू मंदिर होते. त्यामुळे ज्ञानवापी मशीद हिंदूंना देऊन टाकायला हवी. यामुळेच बंधुत्वभाव कायम राहील, असं आचार्य सत्येंद्रा दास म्हणाले आहेत.
ज्ञानवापीच्या ठिकाणी हिंदू समाज मंदिर बांधेल आणि त्याठिकाणी आपल्या देवाची पूजा करेल. त्यामुळे माझी मुस्लीम समूदायाला विनंती आहे की, त्यांनी काही लोकांच्या वक्तव्यांमुळे उत्तेजित होऊ नये. दोन्ही धर्मांमधील संबंध कायम राहतील आणि बंधूभाव वाढत राहील, असंही ते म्हणाले.
ज्ञानवापी परिसराचा सर्वेक्षणाचा जवळपास आठशे शब्दांचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. या अहवालामध्ये ज्ञानवापी मशीद ज्या ठिकाणी आहे तिथे सतराव्या शतकात भव्य हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला आहे. ज्ञानवापी परिसरात अनेक पुरातन मूर्ती आढळून आल्या आहेत. ज्या हिंदू देवतांच्या आहेत. शिलालेख आढळून आलेत ज्यावरुन देखील तिथे मंदिर असल्याचा उल्लेख आहे, असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. येत्या काळात या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
माहितीनुसार, ज्ञानवापीच्या ठिकाणी ५५ हिंदू देवतांची शिल्पे आढळली आहेत. त्यात १५ शिवलिंगे, तीन विष्णू शिल्पे, गणेशाची तीन, नंदीचे दोन तर कृष्णाचे दोन आणि हनुमानाची पाच शिल्पे आढळून आली आहेत. याठिकाणी ९३ नाणीही सापडली आहेत. घरगुती वापराच्या २५९ वस्तू आढलल्या आहेत. हिंदू पक्षकारांनी या मशिदीवर दावा करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.