Gyanvapi Masjid Case : अखिलेश यादव, ओवैसींना मोठा दिलासा; न्यायालयानं फेटाळला विरोधातील अर्ज

या नेत्यांनी अमर्याद आणि बेकायदेशीर विधानं करून हिंदू समाजाप्रती द्वेष पसरवण्याचं कृत्य केलंय.
Asaduddin Owaisi Akhilesh Yadav
Asaduddin Owaisi Akhilesh Yadavesakal
Updated on
Summary

ज्ञानवापी आवारात हातपाय धुतले जातात, घाण पसरवली जाते, असा आरोप करत वकील पांडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

वाराणसी : ACJM (I) उज्ज्वल उपाध्याय यांच्या न्यायालयानं ज्ञानवापीच्या वाजूखानामधील गोंधळ आणि नेत्यांच्या वक्तव्याबाबत वकील हरिशंकर पांडे यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळला.

हरिशंकर पांडे यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर द्वेषपूर्ण भाषण केल्यामुळं कारवाईची मागणी केली होती.

या नेत्यांनी अमर्याद आणि बेकायदेशीर विधानं करून हिंदू समाजाप्रती द्वेष पसरवण्याचं कृत्य केलंय, असा आरोप करण्यात आला होता. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आदेश राखून ठेवत 14 फेब्रुवारीची तारीख निश्चित केलीये.

Asaduddin Owaisi Akhilesh Yadav
Pakistan : धक्कादायक! कबरीत घुसून 48 मृत महिलांवर बलात्कार; तरुणांचं घृणास्पद कृत्य

ज्ञानवापी आवारात हातपाय धुतले जातात, घाण पसरवली जाते, असा आरोप करत वकील पांडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हे स्थान आपल्या भगवान शिवाचं आहे. हा हिंदू समाजाचा अपमान आहे. यासोबतच एआयएमआयएम प्रमुख ओवैसी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव आदींनी सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाबाबत वादग्रस्त विधानं करून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असाही आरोप करण्यात आला होता.

Asaduddin Owaisi Akhilesh Yadav
Assembly Election : श्रीरामाचं भजन गाणाऱ्यांनीच इथं रहावं, नाहीतर..; भाजप प्रदेशाध्यक्षांचा गर्भित इशारा

हरिशंकर पांडे यांनी मौलाना अब्दुल वाकी, अंजुमन व्यवस्था समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल बतीन नोमानी, समितीचे सहसचिव सय्यद मोहम्मद यासीन आणि निवेदन देणाऱ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.