Gyanvapi Case: ज्ञानवापीतील पुजेनंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी, व्यासजींच्या तळघराबाहेर लांबच लांब रांग

Gyanvapi Case: उत्तरेकडील दरवाजातून विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या लोकांना व्यासजींचे तळघर आणि आत ठेवलेल्या मूर्ती पाहण्याची संधी मिळत आहे. दुपारी ४ वाजता आरती झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
Gyanvapi Case
Gyanvapi Case
Updated on

Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या तळघराता पूजेसाठी हिंदू पक्षाला जिल्हा न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तळघरात दररोज ५ वेळा आरती करण्यात येते, हिंदू पक्षाच्या वकीलांनी ही माहिती दिली.  उत्तरेकडील दरवाजातून विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या लोकांना व्यासजींचे तळघर आणि आत ठेवलेल्या मूर्ती पाहण्याची संधी मिळत आहे. दुपारी ४ वाजता आरती झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

काल (बुधवार) व्यासजींच्या याचिकेवर निकाल देताना वाराणसी जिल्हा न्यायालयाने तळघरात पुजेसाठी परवानगी दिली होती. तळघराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपारपर्यंत कोणालाही तळघराकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर मंदिर व्यवस्थापनाने निर्णय घेतला की, आज (गुरुवार) दुपारी ४ वाजल्यापासून व्हीआयपी आणि सुगम दर्शन तिकीट घेऊन येणाऱ्यांना तळघराच्या समोरून प्रवेश दिला जाईल.

यासह येथील मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ते विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात जातील. दुपारी ४ वाजता आरती झाल्यानंतर तिकीटधारकांसह सर्वसामान्यांनाही या मार्गाने प्रवेश देण्यात आला. ज्यांना तळघरात जायचे होते त्यांची रांग लागली होती. काही वेळातच तळघरासमोर लांबच लांब रांग लागली. आत ठेवलेल्या मूर्ती पाहून लोक विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाकडे जात होते. (Latest Marathi News)

Gyanvapi Case
Budget 2024: बजेटमधून पदरी निराशाच! शेतकरी सन्मान निधी, टॅक्स 'जैसे थे'; ८वा वेतन आयोगही दूरच

व्यासजींचे कुटुंब 1993 पर्यंत या तळघरात पूजा करत होते.अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ज्ञानवापीला लोखंडी कुंपणाने वेढले गेले होते. त्याच्या आत तळघर देखील होते. त्यामुळे  पूजा सेवा बंद करण्यात आली होती. यावर व्यासजींचे कुटुंबीय न्यायालयात गेले होते आणि पूजा करण्याची परवानगी मागितली होती.

Gyanvapi Case
Israel war on Gaza: गाझात २४ तासांत १५० जणांचा मृत्यू; गाझाच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.