शिवलिंग सापडलं तर आमचं अन् मृतदेह सापडले तर तुमचे; भाजपाचं ओवैसींना थेट आव्हान

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on
Summary

'जिथं मशिदीच्या परिसरात उत्खनन केलं जातंय, तिथं शिवलिंग सापडत आहे.'

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणात (Gyanvapi Masjid Survey) 'शिवलिंग' कथितरित्या आढळल्यानंतर वादग्रस्त विधानं थांबताना दिसत नाहीयत. दरम्यान, तेलंगणा भाजपचे (Telangana BJP) प्रमुख बंदी एसके यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनाच थेट आव्हान दिलंय. ते म्हणाले, राज्यातील सर्व मशिदी आम्ही खोदून काढू. तिथं शिवलिंग सापडले तर आमचे आणि मृतदेह सापडले तर तुमचे, असं त्यांनी खुलं आव्हान दिलंय.

तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले, "जिथं मशिदीच्या परिसरात उत्खनन केलं जातंय, तिथं शिवलिंग सापडत आहे. राज्यातील सर्व मशिदी आम्ही खोदून काढू, असं मी ओवैसींना आव्हान देत आहे. जर मृतदेह सापडले तर ते तुमचे (मुस्लिमांचे) आहेत आणि शिवलिंग सापडलं तर ते आमच्या स्वाधीन करा, असं त्यांनी आवाहन केलंय.

Asaduddin Owaisi
यासिन मलिक हिटलर मोदींना आव्हान देणारा सर्वात धाडसी व्यक्ती : मुशाल मलिक

बुधवारी रात्री करीमनगरमध्ये मोठ्या 'हिंदू एकता यात्रे'ला संबोधित करताना तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केलीय. कुमार यांनी दावा केलाय की, तेलंगणात पूर्वी मुस्लिम शासकांनी अनेक मंदिरं पाडली आणि त्यांच्या जागी मशिदी बांधल्या. ओवैसींना खुलं आव्हान देत त्यांनी राज्यातील सर्व मशिदींमध्ये उत्खनन करण्याचं आवाहन केलंय आणि धार्मिक चिन्हे आढळल्यास हिंदू ती जागा ताब्यात घेईल, असंही त्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.