Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर सापडले तेलुगु भाषेतील शिलालेख; मंदिर निर्माणबद्दल मोठी माहिती आली समोर

Gyanvapi Mosque Latest Update : मागील काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी समोर आला आहे
Gyanvapi Mosque Latest Update :
Gyanvapi Mosque Latest Update :
Updated on

Gyanvapi Mosque Latest Update : मागील काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. रिपोर्टमध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यादरम्यान आता म्हैसूरमधील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या टीमला वाराणसीत असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर तीन तेलुगु भाषेतील शिलालेख सापडले आहेत.

एएसआय डारेक्टर के मुनीरत्नम रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काशी विश्वनाथ मंदिरासंबंधी दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये यामधील माहिती दिली आहे. येथे सापडलेल्या ३४ शिलालेखांमध्ये तीन शिलालेख हे तेलुगु भाषेतील आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुनीरत्नम यांनी सांगितेल की, हे शिलालेख १७व्या शतकातील असून यामध्ये नारायण भाटलू त्यांचा मुलगा मल्लाना भाटलू अशा नावांचा स्पष्टपणे उल्लेख आढळतो.

Gyanvapi Mosque Latest Update :
Chandigarh Mayor Election: महापौरपदाच्या निवडणुकीत असं करू शकतात तर... 'इंडिया'च्या पहिल्या पराभवानंतर केजरीवालांची टीका

त्यांनी पुढे सांगितले की, लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे नारायना भाटलू हे तेलुगु ब्राम्हण आहेत ज्यांनी १५५८ साली काशी विश्वनाथ मंदिराच्या बांधकामाच्या देखरेखीचे काम केले होते. असे सांगितले जाते की जौनपूरचे सुलतान हुसेन शराकी (१४५८-१५०५) याने पंधराव्या शतकात काशी विश्वनाथ मंदीर पाडण्याचे आदेश दिले होते. हे मंदिर १५८५ साली पुन्हा बांधण्यात आले. राजा तोडरमल यांनी दक्षिणेतील तज्ज्ञ नारायण भाटलू यांना मंदीराच्या बांधकामावर देखरेख करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता सापडलेले शिलालेख हे त्याला दुजारा देतात.

हे शिलालेख ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर कोरण्यात आले आहेत आणि ते तेलुगु भाषेत आहेत. जरी हे शिलालेख नुकसान झालेले आणि अपूर्ण असले तरी यामध्ये मल्लाना भाटलू आणि नारायण भाटलू यांचा उल्लेख आढळतो असेही एएसआय डायरेक्टर म्हणाले.

मशिदीत आढळलेल्या दुसऱ्या शिलालेखात 'गोवी' असा उल्लेख देखील आढळला आहे. गोवी याचा अर्थ मेंढपाळ असा होतो.

Gyanvapi Mosque Latest Update :
Budget 2024: अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

तर तिसरा शिलालेख हा १५व्या शतकातील असून तो मशिदीच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापडला आहे. यामध्ये १४ ओळी आहेत ज्या पुर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे एएसआय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. तेलगु भाषेसोबतच कन्नडा, देवनागरी आणि तामिळ भाषेतील शिलालेख देखील आढळले आहेत.

एएसआय सर्व्हे रिपोर्टमध्ये खुलासा झाला की, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एकेकाळी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते, असा दावा हिंदू गटाकडूनही केला जात आहे. दरम्यान अहवालात असे म्हटले आहे की मशिदीची पश्चिम भिंत हिंदू मंदिराचा भाग आहे आणि ३२ हिंदू मंदिरांचे शिलालेख सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.