Gyanvapi Masjid : मुलायमसिंह यादव सरकारने ज्ञानवापीतील व्यासजी तळघर का केलं होतं बंद, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Gyanvapi Masjid : मुलायमसिंह यादव सरकारने ज्ञानवापीतील व्यासजी तळघर का केलं होतं बंद, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. जाणून घ्या
Gyanvapi Masjid
Gyanvapi MasjidEsakal
Updated on

वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी येथील 1993 पूर्वी ज्या पद्धतीने केली जात होती तशी व्यासजी तळघरात नियमित पूजा सुरू करण्यात आली आहे. आता व्यास कुटुंबीय तळघरात पूजा करणार आहेत. 1993 पूर्वी येथे सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय पूजा-आरती करत होते.

ज्ञानवापी येथे तळमजल्यावरती हे तळघर आहे, जिथे स्वस्तिक, कमळ आणि ओम यासारख्या हिंदू धर्माशी संबंधित चिन्हे सापडलेली आहेत. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी व्यास कुटुंबाकडून तळघरात पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, त्यानंतर ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणात व्यासजींच्या तळघराचीही चौकशी करण्यात आली होती. तपासात तळघरात मंदिराचे पुरावे सापडले असून न्यायालयाने बुधवारी व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली आहे.

Gyanvapi Masjid
ज्ञानवापी तळघरातील पूजा ३१ वर्षांपूर्वी का आणि कोणी बंद केली होती?

व्यासजींच्या तळघरात पूजेची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी प्रशासनाला एका आठवड्याची मुदत दिली आहे. ज्ञानवापी येथे व्यासजींचे तळघर कोणते आहे, ते कोठे आहे आणि 1993 मध्ये येथील पूजा का बंद करण्यात आली ते जाणून घेऊया.

व्यासजींचे तळघर कुठे आहे?

1993 पूर्वी व्यासजी तळघरात पूजा करणारे व्यास कुटुंबाचे नातू आशुतोष व्यास यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ज्ञानवापीमध्ये 10 तळघर आहेत. ज्ञानवापी येथे व्यासजींचे तळघर दक्षिणेकडे आहे. येथे असलेल्या 10 तळघरांपैकी दोन तळघर उघडण्यात आले आहेत. न्यायालयात दावा दाखल करण्यात आला त्यामध्ये असे सांगण्यात आले की, ज्ञानवापी संकुलात नंदीच्या समोर व्यासजी तळघर आहे. हे तळघर प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी व्यास कुटुंबाचे मुख्य आसन आहे. शैव परंपरेत 400 वर्षापासून व्यास कुटुंबीय पूजा करत असत. ब्रिटिशांच्या काळातही व्यास कुटुंबाने खटला जिंकून तळघराचा ताबा कायम ठेवला होता.

Gyanvapi Masjid
Gyanvapi Mosque: ज्ञानवापी परिसरात पूजेला सुरुवात, तब्बल 31 वर्षांनंतर होतेय देवाची आरती; पाहा व्हिडिओ

व्यासजींच्या तळघरातील पूजा का थांबवली?

आशुतोष व्यास यांनी सांगितले की, 1993 पासून व्यासजींचे तळघर बंद करून बॅरिकेड लावण्यात आले होते. पुढे ते म्हणाले की, त्यावेळी समाजवादी पक्षाचे सरकार होते आणि मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते. अयोध्या रामजन्मभूमीच्या मुद्द्याबाबत मुलायमसिंह यादव यांनी येथील जातीय वातावरण बिघडू नये आणि हाणामारी होऊ नये यासाठी याठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. प्रथम बांबूचे खांब लावून तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले व नंतर ते कायमचे बंद करण्यात आले. तेव्हापासून तेथील पूजा थांबली होती.

पुढे बोलताना आशुतोष व्यास म्हणाले, 'आधी आमचे कुटुंबीय पूजा-अर्चना करत होते. आम्ही आत गेलो आहे. दरवर्षी जात होतो. तिथे ज्ञानवापीमध्ये रामचरितमानस होत असे. त्याजवळ बांबूचे गठ्ठे ठेवले आहेत. आत खूप अंधार आहे. आतमध्ये अनेक शिवलिंगे असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवलिंग आहे, नंदी आहे, तुटलेला नंदी असेल आणि खांबांवर कमळ, स्वस्तिक आणि ओमच्या आकृत्या आहेत असे म्हणतात. आशुतोष व्यास सांगतात की, 1993 पूर्वी जलाभिषेक करून रुद्राभिषेक केला जात होता. आरती, पूजा, भजन सगळं व्हायचं. तीन वेळा पूजा होत असे. सकाळच्या पूजेनंतर दुपारी देवाला नैवेद्य दाखवून सायंकाळी पूजा व आरती केली जात होती.

Gyanvapi Masjid
Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी

व्यासजींच्या पूजेसाठी याचिका कोणी दाखल केली होती?

25 सप्टेंबर 2023 रोजी शैलेंद्र ठाकूर पाठक यांनी व्यासजींच्या तळघरात पुन्हा पूजा सुरू करण्याची परवानगी मागणारा दावा दाखल केला होता. शैलेंद्र ठाकूर पाठक हे व्यास कुटुंबातील आहेत. हिंदू बाजूने विनंती केली की न्यायालयाने एका रिसीव्हरची नियुक्ती करावी जो तळघरात पुजाऱ्याने केलेल्या पूजेचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करेल. तळघरात असलेल्या मूर्तींची नित्यनेमाने पूजा करणे आवश्यक आहे, असा युक्तिवादही करण्यात आला.

सर्वेक्षणात हिंदू धर्माशी संबंधित चिन्हे, मुर्ती आणि मंदिरांचे पुरावेही आढळले आहेत. यानंतर, न्यायालयाने 17 जानेवारी 2024 रोजी एक आदेश दिला आणि एक रिसीव्हर नियुक्त करण्यात आला, परंतु पूजेबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यानंतर 31 जानेवारी रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली.

Gyanvapi Masjid
Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर सापडले तेलुगु भाषेतील शिलालेख; मंदिर निर्माणबद्दल मोठी माहिती आली समोर

कोर्टाच्या निर्णयावर व्यास कुटुंबीयांची प्रतिक्रिया?

आशुतोष व्यास म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला आहे आणि आता 400 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. ते म्हणाले, 'हा आपल्या पूर्वजांचा त्याग आहे, जे 400 वर्षे लढत होते. तळघरावर आपला हक्क आहे. 1993 पूर्वी तेथे पूजा होत असे.

31 जानेवारीच्या निकालात न्यायालयाने काय म्हटले?

31 जानेवारी रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने व्यासजी तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली. तसेच, न्यायालयाने प्रशासनाला 1 आठवड्याची मुदत दिली असून, त्यामध्ये तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाची बैठक झाली आणि 11 तासांनंतरच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तळघरात आरती करण्यात आली. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास व्यासजी तळघरात 31 वर्षांनंतर दिवा लावला गेला. आरती करण्यात आली. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून तिन्ही वेळेची नियमित पूजा सुरू करण्यात आली.

Gyanvapi Masjid
मुस्लिमांनी आता ज्ञानवापी मशिदीत नमाज पढू नये, कारण...; आचार्य सत्येंद्र दास यांनी दिला शरियतचा दाखला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.