Halwa Dish : अरबी भूमीत जन्मलेला हलवा भारतात कसा आला? लोकसभेत बनलाय वादाचा मुद्दा!

Budget Ka Halwa : तुम्हाला माहिती आहे का आज अधिवेशन गाजवणारा हलवा आपल्या भारताचा नाहीच आहे. तो परदेशातून भारतात आला आणि कधी आपल्या मातीत मिसळला हे आपल्यालाही कळलेलं नाही.
Halwa dish hostory
Halwa dish hostoryesakal
Updated on

Halwa Dish :   

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी झालेल्या सत्रात संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बजेटच्या आधी होणाऱ्या ‘हलवा सेरेमनी’वर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी बजेटचा मुद्दा धरून सत्ताधाऱ्यांनी हलवा वाटून खाल्ला,यात कोणी दलित, ओबीसी, आदिवासी नेते, अधिकारी दिसत नाहीयेत. देशाच्या बजेटचा हलवा खिरापती सारखा वाटला जात आहे. आणि यात मला देशातली ७३% जनता दिसतच नाहीये, असेही राहूल गांधी म्हणाले.

Halwa dish hostory
Rahul Gandhi : महाभारताचा ‘चक्रव्यूह’ आता ‘पद्मव्यूह’;राहुल यांचे भाजपवर टीकास्त्र; अदानी, अंबानी पुन्हा लक्ष्य

बजेटचा हलवा तर वाटला जातोय पण देशाला मिळतोय का?

अधिवेशनाच्या सत्रात राहुल गांधींनी केंद्रीय अर्थसंकल्पाचा हलवा सगळ्यांनी मिळून खाल्ला तो खिरापती सारखा वाटला गेला. पण तो खरच देशाच्या कामी येणार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

तुम्हाला माहिती आहे का, आज अधिवेशन गाजवणारा हलवा आपल्या भारताचा नाहीच आहे. तो परदेशातून भारतात आला आणि कधी आपल्या मातीत मिसळला हे आपल्यालाही कळलेलं नाही. (Rahul Gandhi)

हलवा हा शब्द अरबी शब्द हुलव यापासून आला आहे. याचा अर्थ गोड असा होतो. सुरुवातीला हा पदार्थ खजूरची पेस्ट आणि दुधापासून बनवला गेला होता. आजही अरबी लोक त्यांच्या खास पाहुण्यांना ओमनी हलवा खायला घालतात.

हा ओमानी हलवा स्टार्च, अंडी, साखर आणि ड्रायफ्रूट्सने बनतो. अरबी देशातील पश्चिम एशियामध्ये या मिठाईला हलवा, हलेवेह, हलवाह, हालवा हेलावा म्हणून ओळखलं जातं.

Halwa dish hostory
Halwa Recipe : रव्याचा शिरा नेहमीच खातात, पण कधी बेसनाचा शिरा ट्राय केलात का? जाणून घ्या रेसिपी

सर्वात आधी हलवा कोणी बनवला

हलव्याचा शोध कोणी लावला याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जातात. पण एक रिपोर्टनुसार सर्वात आधी तुर्की या देशात हलवा बनवण्यास सुरुवात झाली. राजधानी इस्तांबूलमध्ये अनेक लोक सांगतात की, सर्वात आधी तुर्की मध्येच हलव्याचा शोध लागला होता. आमच्या पूर्वजांनीच हलव्याची रेसिपी शोधून काढली होती.

‘डिक्शनरी ऑफ इंडिया’ मध्ये इतिहास तज्ञ के.टी.अचाया लिहितात की, जेव्हा पहिल्यांदा हलवा आला तेव्हा तो तुर्की मिठाई या नावाने प्रसिद्ध होता. जो बारीक केलेले तीळ आणि मध यापासून बनला होता.

Halwa dish hostory
Sohan Halwa Recipe : ही टेस्टी डिश खाऊन विसरून जाल इतर मिठाईंची चव, लगेच नोट करा रेसिपी

भारतात कधी आला हलवा

अरबी देशातील हलवा भारतात मुघलांसोबत आला. ‘फीस्ट्स एंड फास्ट्स’ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात हलवा तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकाच्या दरम्यान आला असेल. मालवाच्या राजासाठी १५०० मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकात ‘नियतनामा’ आणि ‘बुक ऑफ डिलाइट्स’मध्ये हलव्याची माहिती आणि त्याची रेसिपी देण्यात आली आहे.

लखनऊमधील इतिहास तज्ञ अब्दुल हलीम शरर यांनी ‘गुजीस्था लखनऊ’ या पुस्तकात हलवा अरबी देशातून फारशी देशातून रस्त्यांच्या मार्गे भारतात आला असे सांगितलं. तर इतिहास तज्ञ लिली स्वर्ण यांचं म्हणणं आहे की हलवा सीरिया- अफगाणिस्तान कडून भारतात आला.

Halwa dish hostory
Amla Halwa : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खा आवळ्याचा हलवा, सोपी आहे रेसिपी

भारतात गाजराचा हलवा प्रसिद्ध करण्यातही मुघलांचाच हात आहे. पूर्वकाळापासून भारतात गाजर पिकवले जात नाहीत. पण गाजर फारशी आणि अफगाणिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात पिकवलं जात होतं.

तिकडून भारतात आक्रमण करून आलेल्या मुघलांनीच भारतात गाजर आणलं. आणि गाजराचे पदार्थही फेमस केले. मुघल काळात गजराला एक आहार म्हणून पाहिलं गेलं. मुघल साम्राज्याचे राजकुमार हुमायू यांची बहिण गुलबदन बेगम यांनी ‘हलवा-ए-जरदक’ म्हणजे गाजराचा हलवा बनवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.

असा हा हलवा आपल्या भारतातील प्रत्येक घरात बनवला जातो. त्याने तर आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रसादातही स्थान मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.