Hamas-Israel Conflict:इस्राइल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हमासने इस्राइलवर हल्ला केल्यामुळे या युद्धाची ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही लष्करांमध्ये घमासान युद्धाची सुरुवात झाल्यानंतर इतर देशांनीही दोन्ही गटांची बाजू घ्यायला सुरुवात केली. इराणने हमासची बाजू घेतली, तर अमेरिकेने इस्राइलला ७ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली.
मात्र, यामध्ये भारताची भूमिका देखील महत्वाची आहे. मागच्या काही वर्षांपासून इस्राइल आणि भारतामधील मैत्रीपूर्ण संबंध चांगले होत गेले. त्यानंतर हमासविरुद्ध भारताने इस्राइलला पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलं. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइलच्या पंतप्रधांनाचा फोन आला आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतनयाहू यांनी इस्राइलच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल नरेंद्र मोदींना माहिती दिली.
इस्राइलच्या पंतप्रधानांचा फोन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, "फोन करुन इस्राइलच्या परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल पंतप्रधान नेतनयाहू यांचे आभार मानतो. अशा अडचणीच्या काळात भारताचे लोक इस्राइलसोबत आहेत. भारत अशा दहशतवादी प्रवृत्तींचा उघडपणे निषेध करतो."
जेव्हा इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांकडून रॉकेट हल्ला करण्यात आला होता, तेव्हा भारताने इस्राइलला पाठिंबा दिला होता आणि भारत एकजुटीने तुमच्यासोबत असल्याचे सांगितले होते.(Latest Marathi News)
इस्राइल आणि हमासच्या या युद्धात लेबनाननेही उडी घेतली आणि इस्राइलवर हल्ला चढवला. त्यानंतर इस्राइलकडून आक्रमक स्ट्रॅटजी वापरण्यात आली. इस्राइलने आपल्या अत्याधुनिक ड्रोन्सने गाझापट्टीवर बॉम्बचा वर्षाव केला. त्यांनी गाझापट्टीत राहणाऱ्या सामान्य नागरिकांना गाझापट्टी खाली करण्याचे आदेशही दिलेत. म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला जाऊ शकतो. या संघर्षात आतापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.