Hamida Banu : कुस्तीत हरली तर बाबा पहेलवानसोबत लग्न करावं लागणार होतं; वाचा धाडसी मुस्लीम महिलेची अनोखी गाथा

तो असा काळ होता जेव्हा भारतात कुस्तीमध्ये महिलांना स्वीकारणे कठीण होतं पण हमीदाने स्वत:ला सिद्ध केलं.
Muslim woman wrestler Hamida Banu
Muslim woman wrestler Hamida Banu sakal
Updated on

Muslim woman wrestler Lifestory : ही गोष्ट आहे 1954मधील, बडोद्यात एक आगळी वेगळी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी जमली होती.बाबा पहेलवान त्यावेळचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. नावाजलेल्या बाबा पहेलवानच्या विरोधात कुणी पुरूष नाही तर एक महिला होती आणि ती मुस्लीम होती.

पैज अशी होती की जर ही महिला या कुस्तीत हरली तर तिला बाबा पहेलवानसोबत लग्न करावं लागणार.मग काय, पुढे काय झालं.. हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (Hamida Banu a trailblazing Muslim woman wrestler life history )

बाबा पहेलवानने मोठ्या आत्मविश्वासाने आखाड्यात प्रवेश केला. त्याला पुर्ण खात्री होती की तो महिलेला सहज पराभूत करणार आणि तिच्याशी लग्न करणार. याच आत्मविश्वासाने त्याने जर कुस्ती आपण हरलो तर आपण या पुढे कधीही कुस्ती खेळणार नाही म्हणजेच निवृत्त होणार असल्याचेही घोषणा केली पण त्याला नव्हतं माहिती की ज्या महिलेला तो क्षुल्लक समजून तिच्याशी सामना खेळतोय.

तिने या पूर्वी कोलकत्त्यातील एक शिख आणि एक हिंदू पहेलवानांना पराभूत केले होते.मग काय, अवघ्या 1 मिनिट आणि 34 सेकंदात तिने बाबा पहेलवानचाही पराभव केला आणि ही त्याची शेवटची कुस्ती ठरली.

Muslim woman wrestler Hamida Banu
Wrestler : तीन दशकांत एक ‘हिंदकेसरी’, तर दोन ‘महाराष्ट्र केसरी’ घडले; प्रतीक्षा बागडीच्या यशाने ‘चार चाँद’

हा बाब पहेलवान सोबत सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. ही महिला साधारण नव्हती. या महिलेचं नाव आहे हमीदा बानू. भारतातील मुस्लिम महिला कुस्तीपटू जीने अनेक रेकॉर्ड मोडले आणि आपली आगळी वेगळी ओळख बनवली. तो असा काळ होता जेव्हा भारतात कुस्तीमध्ये महिलांना स्वीकारणे कठीण होतं पण हमीदाने स्वत:ला सिद्ध केलं.

1900 च्या दशकाच्या सुरुवातीला अलिगढजवळ एका कुस्ती कुटुंबात हमीदाचा जन्म झाला. जेव्हा तिने 1937 मध्ये कुस्तीमध्ये पदार्पण केले तेव्हा तिला तिने चांगली ओळख कमावली होती.

Muslim woman wrestler Hamida Banu
Eid 2023 : आयुष्यातील खास लोकांना द्या ईदच्या खास शुभेच्छा

तिने दिल्लीत दोन पुरुष कुस्तीपटूंना हरविले पण तरीसुद्धा तिची महती पोहचली नव्हती. पुढला सामना फिरोज खानशी होता. फिरोज पहिल्यांदा तिच्याकडे बघून हसला पण नंतर तो लढायला तयार झाला आणि मग काय त्याला पश्चाताप होणारच.त्याला काही कळण्याआधीच हमिदाने त्याला जमिनीवर लोळवले मग काय तर तो उठूही शकला नाही.

स्वातंत्र्यपूर्व भारतात महिलांनी कुस्तीच्या रिंगमध्ये उतरणे अशोभनीय मानले जात असे.तिला अपमानित केले जायचे त्याच वेळी उत्तर भारतातील मुस्लिम महिलांना तर पर्दा म्हणजेच बुरखा प्रथा पाळण्यास सांगितले जायचे पण या सर्वांमध्ये हमीदा सामान्य स्त्री नव्हती.

Muslim woman wrestler Hamida Banu
Eid 2023: ईद मुबारक! ईदला बॉलीवूडचे तारेही चमकले...दिल्या शुभेच्छा

तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, भारतीय कुस्तीची पवित्र ग्रेल असलेल्या अमृतसरमधील आखाड्यात तिने पाऊल ठेवताच तिला आणखी काही गोष्टींचा सामना करावा लागला. स्थानिक पुराणमतवादी मुस्लिम पुरुष, सार्वजनिक ठिकाणी कुस्तीपटूचा पोशाखावरुन लोकांनी जोरदार निषेध केला. तिच्यावर दगडफेक केली आणि दंगल घडवून आणली. या पासून स्वत:ला वाचवण्यासाठी तिला पंजाबमधून पळून जावे लागले पण लढा सुरूच होता.

कापलेले केस आणि तिचा कुस्तीचा पोशाख चिलखतासारखा दिसणारा, हमीदाने एका दशकाहून अधिक काळ कुस्ती मंडळे आणि वर्तमानपत्रांच्या मथळ्यांवर वर्चस्व गाजवले.तिने युरोपियन बॉक्सर्सना लढण्यासाठी आव्हान देण्यापूर्वी भारतात 320 बाउट्स जिंकल्या होत्याहमीदा बानूला ​​​​"अलिगडचा अॅमेझॉन" म्हणूनही ओळखले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.