GPS शिवाय शत्रूला संपवू शकते HAMMER; राफेलसोबत असणार खास मिसाईल

rafale
rafale
Updated on

नवी दिल्ली - भारताच्या हवाई दलामध्ये राफेल लढाऊ विमाने आल्यानं शत्रूला रोखण्यासाठी आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची देशाची ताकद यामुळे वाढली आहे. राफेल लढाऊ विमानासाठी हवाईदलाने खास अशा HAMMER ची मागणी केली होती. त्याची फ्लाइट टेस्ट करण्यात आली. HAMMER म्हणजे हायली एजाइल अँड मॅन्युवरेबल म्यूनिशन एक्स्टेंडेड रेज. हे असं शस्त्र आहे जे जीपीएसशिवाय टार्गेट शोधून ते नष्ट करतं. दक्षिण पश्चिम फ्रान्समध्ये या मिसाइलच्या शक्तीशाली व्हर्जनची फ्लाइट टेस्ट करण्यात आली. राफेलमध्ये लावण्यात येणारे हे दुसरे सर्वात ताकदवान असं मिसाइल असेल. जवळापस 1200 किलो वजनाचे SCLAP क्रूज मिसाइलचा मारा राफेलमधून करता येतो. 

हॅमर मिसाइलची रेंज 20 ते 70 किलोमीटर इतकी असू शकते. म्हणजेच लाँच एअरक्राफ्ट शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमच्या नजरेत येणार नाही. तसंच प्रदेश कसाही असला तरी मिसाइट टार्गेट शोधू शकते. कमी उंचीवर, पर्वतीय भागात शत्रूला शोधण्याचे तंत्र यात आहे. हॅमर एका प्रशिक्षित मिसाइलप्रमाणे काम करते आणि बॉम्बसुद्धा आहे. हे एक मॉड्युलर वेपन असून चालवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. याला सॅटेलाइट गायडन्स, इन्फ्रारेड  सीकर आणि लेझरच्या माध्यमातून गाइड करता येते. 

हॅमर किटला वेगवेगळ्या आकाराच्या बॉम्बसोबत फिट करता येते. हे मिसाइल 125 किलो, 250 किलो, 500 किलो आणि 1 हजार किलोचे बॉम्ब लाँच करू शकते. एक हजार किलोच्या या व्हर्जनची फ्लाइट टेस्ट करण्यात आली. हे मिसाइल बंकरसुद्धा उद्ध्वस्त करू शकतात. एकावेळी अनेक टार्गेटवर हल्ला करण्यासाठी हॅमरचा उपोयग करता येतो. यासाठी मेंटेनन्स कॉस्टही जास्त नाही. डेटा लिंकची कपॅबिलिटीसुद्धा आहे.

लडाखमध्ये प्रत्यक्ष निंयत्रण रेषेवर चीनसोबत तणावचे वातावरण असताना राफेलसोबत हॅमरमुळे भारताची ताकद वाढली आहे. भारताने 2016 मध्ये फ्रान्सकडून जवळपास 59 हजार कोटी रुपयांची 36 राफेल लढाऊ विमाने घेण्यासाठी करार केला होता. यामध्ये 30 विमानांचा वापर युद्धजन्य परिस्थितीमध्ये केला जाईल. तर सहा लढाऊ विमाने प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. भारताला आतापर्यंत दोन टप्प्यात आठ राफेल लढाऊ विमाने मिळाली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.