Viral: धाडसी दिव्यांग Swiggy Delivery Girlचं सोशल मीडियावर कौतुक; ठरली अनेकांसाठी प्रेरणा

या दिव्यांग महिलेचं धाडस बघून सोशल मीडियावर अनेकांनी तिचं कौतुक केलंय
Swiggy Delivery Girl Photo Viral on social media
Swiggy Delivery Girl Photo Viral on social mediaesakal
Updated on

Swiggy Delivery Girl: ऑनलाईन प्लॅटफॉर्म Swiggy वरून दररोज हजारो ग्राहक ऑनलाईन जेवण मागवत असतात. मात्र एका ग्राहकाने Swiggyवरून जेवण ऑर्डर केले असता डिलिव्हरी एजंट (Delivery Girl) म्हणून काम करणाऱ्या एका दिव्यांग महिलेने जेवणाचं पार्सल घेऊन येणे त्यालाही अपेक्षित नसावं. तिला बघताच त्यालाही धक्का बसला. जेथे इच्छा तेथे मार्ग ही म्हण या महिलेने प्रत्यक्षात उतरवल्याचे दिसून येते. या दिव्यांग डिलिव्हरी एजंट महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, एक स्विगी सर्व्हिस टी-शर्ट घातलेली दिव्यांग महिला व्हीलचेअरवर (Wheelchair) बसून ग्राहकांच्या ऑडर्स देताना दिसत आहे. एका यूजरने त्याच्या Linkedin अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. आपण ऑर्डर दिल्यावर वेळेत ऑर्डर डिलीव्हर झाला नाही की डिलीव्हरी गर्ल किंवा बॉयवर ओरडतो. मात्र ते आपलं पार्सल पोहोचवण्यासाठी कठोर परीश्रम घेत असतात. हा मोलाचा संदेश यावेळी या यूजरने सोशल मीडियावर शेअर केलाय.

महिलेच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकाने तिला धाडसी तर दुसऱ्याने तिला कष्टाळू असल्याचे म्हणत तिचे कौतुक केले आहे. अनेक दिव्यांग लोकांसाठी ती एक प्रेरणा ठरत असल्याचेही अनेकांनी यावेळी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.