Har Ghar Tiranga Abhiyan हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टपाल कार्यालयात 25 रुपयात मोठा तिरंगा ध्वज उपलब्ध होणार आहे. खेडोपाडी पोस्टमन घरोघरी जाऊन हे ध्वज देणार आहे. या तिरंगा वाटप मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मुरादाबाद पोस्टल विभागातील चार जिल्ह्यांना सोळाशे तिरंगा ध्वज देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनी प्रत्येकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.या अभियानात कागदी झेंडे किंवा प्लास्टिकचे झेंडे देण्याऐवजी कापडी ध्वज देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे या अभियानासाठी लागणारे तिरंगा ध्वज बनवण्याची जबाबदारी वस्त्रोद्योग मंत्रालयावर सोपवण्यात आली होती.
या अभियानासाठी गुजरातच्या कापड गिरणी हजारो झेंडे तयार करण्यात आले आहेत. या तिरंगा ध्वजाचा आकार तीन फूट बाय दोन फूट आहे.या तिरंगा ध्वजात कुठेही जोड लावलेला नाही. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील गावागावातील घरोघरी तिरंगा ध्वज पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने टपाल खात्यावर सोपवली आहे.पहिल्या टप्प्यात मुरादाबाद, रामपूर, अमरोहा आणि संभल जिल्ह्यांतील टपाल कार्यालयांना प्रत्येकी 400 ध्वज प्रदान करण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात झेंडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
हा तिरंगा ध्वज सर्व टपाल काउंटरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा ध्वज खरेदीसाठी शहरातील लोकांना टपाल कार्यालयात जावे लागणार आहे, तर गावातील लोकांना पोस्टमनकडेही हा झेंडा उपलब्ध असेल. वरिष्ठ डाक अधीक्षक वीर सिंग यांनी सांगितले की, राष्ट्रध्वज सर्वसामान्यांना कमी खर्चात उपलब्ध करून दिला जात आहे. सर्व पोस्ट ऑफिसच्या काउंटरवर तिरंगा ध्वज उपलब्ध आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी झेंडा फडकवण्यासाठीही लोकांना प्रबोधन करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.