नवी दिल्ली : भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हरभजनच्या या सन्यासामागे तो आता राजकीय खेळू सुरु करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. नऊ दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची त्यानं भेट घेतली होती. या भेटीवेळी सिद्धू यांनी हरभजसोबतचा फोटो ट्विट करत अनेक शक्यतांनी भरलेला फोटो अशा आशयाचं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळं आता हरभजन राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
हरभजनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता काँग्रेसकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालंधर हा त्याचा मतदारसंघही ठरल्याचं बोललं जातंय. परंतू अद्याप हरभजनचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला नाही पण आता क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसप्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपत दाखल होण्याची उडाली होती अफवा
यापूर्वी क्रिकेटर हरभजन सिंगची भाजपत दाखल झाल्याच्या अफवा उडाल्या होत्या. यानंतर स्वतः हरभजननं समोर येऊन सोशल मीडियातून सुरु असलेल्या चर्चा खोट्या आणि अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. यापूर्वी सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळीच हरभजन काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा झडल्या होत्या. पण असं काहीही झालं नव्हतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.