काँग्रेसमध्ये माझी स्थिती नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी, हार्दीक पटेल भडकले

Hardik Patel
Hardik Patelesakal
Updated on

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे. (Hardik Patel Alleges Congress Leadership)

काँग्रेसमध्ये त्यांची अवहेलना केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पाटीदार समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. गुजरात काँग्रेसमध्ये माझी अवस्था लग्नानंतर नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Hardik Patel on Congress)

Hardik Patel
Congress : निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्याला 'सर्वोच्च' दिलासा

वयाच्या 26 व्या वर्षी प्रदेश काँग्रेसचा सर्वात तरुण अध्यक्ष बनलेल्या हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचा आरोप केला. केंद्रात आणि राज्यात अधिक नेत्यांची उपस्थिती असल्याने निर्णय घेता येत नाही, असं ते म्हणाले.

पाटीदार नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करण्यास झालेल्या दिरंगाईवर हार्दिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये दररोज मीडियामध्ये येतात, त्यामुळे संपूर्ण पाटीदार समाजाचा अपमान होत आहे. हे पाटीदार समाज सहन करणार नाही, असं ते म्हणाले.

Hardik Patel
मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

दोन महिने झाले तरी नरेश पटेल यांचा पक्षात समावेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेस हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असं पटेल यांनी म्हटलं. इंडियन एक्सप्रेसला यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मला पीसीसीच्या (राज्य काँग्रेस कमिटी) कोणत्याही बैठकीला आमंत्रित केलं जात नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते माझा सल्ला घेत नाहीत, मग या पदाचा अर्थ काय? गुजरात काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षाचा अर्थ 'लग्नानंतर नवऱ्याची नसबंदी करण्यासारखा आहे', असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()