गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 6 महिने आधी काँग्रेस (Congress) चे नेते हार्दिक पटेल (Haridik Patel) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पटेल गेल्या महिनाभरापासून पक्षाच्या हायकमांडवर नाराज होते. तेव्हापासूनच ते कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आज हार्दिक पटेल कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
हार्दिक पटेल यांनी 2015 मध्ये गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व केले. पाटीदार आरक्षण आंदोलनानंतर हार्दिक पटेल यांना देशभरात एक ओळख मिळाली. तसेच 2017 च्या गुजरात निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. हार्दिकने 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत सक्रिय राजकारणात प्रवेश केला, हार्दिक पटेल यांच्या कॉंग्रेमधील प्रवेशामागे कांग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा मोठा हात होता.
सातव काय म्हणाले होते?
दरम्यान गुजरातच्या राजकीय परिस्थीतीवर लिहलेल्या एका ट्विटर पोस्टमध्ये पत्रकार दीपल त्रिवेदी यांनी हार्दिक पटेल यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, त्यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते व गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी राजीव सातव (Rajiv Satav) यांनी हार्दिक पटेल हे कशा पध्दतीने कोणाचेच ऐकत नसल्याचा उल्लेख केला आहे.
कॉंग्रेसचे तेव्हाचे प्रभारी राजीव सातव यांनी मला सांगितले की, कसे हार्दिक पटेल यांनी कोणाचेही ऐकण्यास नकार दिला. तसेच माझ्या वाढदिवसापूर्वी मला राज्यसभा द्या, नाहीतर मला गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी मागणी जुलै 2020 मध्ये हार्दिक यांनी केल्याचे सातव यांनी सांगितले. तसेच मागणी पूर्ण न केल्यास हार्दिक पटेल यांनी त्यावेळी काँग्रेस सोडण्याची धमकी दिली होती, असे म्हटले आहे.
हार्दिक पटेलचं म्हणणं काय?
दरम्यान हार्दिक पटेल यांनी राजीनामा देण्यासोबतच सोनिया गांधींना एक पत्रही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पक्ष हायकमांड प्रश्नांवर गंभीर नसल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे, मी जेव्हा गुजरातचे प्रश्न घेऊन जायचो तेव्हा पक्ष नेतृत्व मोबाईल फोनमध्ये व्यस्त असायचे. दुसरीकडे काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी हार्दिकच्या पत्राला भाजपचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.
हार्दिक पटेलच्या नाराजीच्या चर्चेनंतर काँग्रेस हायकमांड सक्रिय झाले होते. राहुल गांधींनीही हार्दिकला मेसेज करून त्यांच्या नाराजीचे कारण जाणून घेतले, मात्र त्यानंतर राहुल यांनी उत्तर दिले नाही. चिंतन शिविरानंतर सर्व काही ठीक होईल, अशी आशा हार्दिकने व्यक्त केली होती. हार्दिक पटेल यांनी अलीकडेच त्यांच्या ट्विटर, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवरील बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव देखील हटवले होते.
तसेच 13 ते 15 मे दरम्यान उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी हार्दिक पटेल यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. हार्दिक पटेल यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटेल यांच्यावर पाटीदार आंदोलनादरम्यान हिंसाचार पसरवल्याचा आरोपांनंतर गेल्या महिन्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक लढवण्याची परवानगीही मिळाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.