हार्दीक पटेल भाजपमध्ये जाणार?, दोन बड्या नेत्यांच्या संपर्कात
नवी दिल्ली : हार्दीक पटेल यांनी आज काँग्रेसला (Hardik Patel Resigned Congress) रामराम ठोकला. त्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात (Hardik Patel Letter To Congress) त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ते गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या संपर्कात असून एका आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हार्दीक पटेल गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. पण, आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट केले आहे. माझ्या निर्णयाचे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. माझ्या या निर्णयानंतर गुजरातसाठी सकारात्मक काम करता येईल, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हार्दीक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सीएए, जीएसटी, अयोध्या आणि कलम ३७० (काश्मीर) या प्रमुख समस्या सोडवण्याच्या मार्गात काँग्रेस पक्ष अडथळा ठरल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसला जवळपास प्रत्येक राज्यात नाकारण्यात आले. जेव्हा मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलो तेव्हा ते त्यांच्या मोबाईलमध्ये आणि गुजरातशी संबंधित समस्या ऐकण्याव्यतिरिक्त इतर समस्यांमध्ये व्यस्त होते. देश कठीण परिस्थितीने वेढलेला असताना आमचे हे नेते परदेशात होते. काँग्रेस नेतृत्वाला गुजरात पूर्णपणे नापसंत असून त्यांना राज्यात रस नाही, असे दिसते. काँग्रेसने तरुणांच्या विश्वासाला तडा दिला आहे, असे आरोप त्यांनी केले आहेत. इतकेच नाहीतर गुजरात काँग्रेसमध्ये होत असलेल्या वादाची तक्रार करून देखील काँग्रेस हायकमांडने लक्ष घातलं नाही, असंही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.