Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट

दिव्यांग असूनही एव्हरेस्ट सर करणाऱ्या हरी बुद्धा मागर यांनी नवा इतिहास रचला
Hari Budha Magar
Hari Budha Magaresakal
Updated on

Hari Budha Magar : दिव्यांग असूनही एव्हरेस्ट सर करणाऱ्या हरी बुद्धा मागर यांनी नवा इतिहास रचला आहे. या यशाने त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक दिव्यांगांना एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा दिली आहे. हरी बुद्धा मागर हे ब्रिटीश सैन्यातील निवृत्त गोरखा सैनिक आहेत. या विजयानंतर मागर यांनी आपल्या एव्हरेस्टच्या चढाईमुळे समाजातील अपंग लोकांविषयीचा समज बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Hari Budha Magar
Men Health : पुरुषांमध्ये दिसणारी ही 10 लक्षणं वाढवतात या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

हिमालयन स्की ट्रेक कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय हरी बुद्धा मागर यांनी कृत्रिम पायांनी 8848 मीटर एव्हरेस्ट शिखर सर केले. या कामगिरीने जग थक्क झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हरी बुद्धा मागर यांनी युद्धात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. अफगाणिस्तानात तैनात असताना त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले होते.

Hari Budha Magar
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

कोण आहेत हरी बुद्धा मागर?

हरी बुद्धा मागर यांचा जन्म नेपाळच्या पश्चिमेकडील एका खेडेगावात 1979 मध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण रोल्पा जिल्ह्यात झाले. शाळेत जाण्यासाठी तो दररोज सुमारे 45 मिनिटे अनवाणी चालत जात. कागद आणि पेन नसताना लाकडी पाटीवर खडूच्या दगडाने लिहायला शिकले. मागर यांचे वयाच्या 11 व्या वर्षी लग्न झाले होते.

Hari Budha Magar
Health News : 10 पैकी 4 रूग्ण डोळ्यांच्या विकाराचे; वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

मागर यांनी 1999 मध्ये ब्रिटीश सैन्यात योगदान दिले होते. रॉयल गोरखा रायफल्सच्या माध्यमातून ब्रिटीश सैन्यात भरती झाले. तेव्हा ते 19 वर्षांचे होते. त्यांनी पाच खंडांमध्ये सेवा दिलीय. एव्हरेस्ट सर करण्याच्या त्यांच्या मोहिमेला 'नो लेग्ज, नो लिमिट' असे नाव देण्यात आले.

एव्हरेस्ट चढण्याची योजना

मागे यांचे जीवनातील अंतिम ध्येय माउंट एव्हरेस्ट (8848 मी) सर करणं होतं. 2017 मध्ये, नेपाळ सरकारने दिव्यांग गिर्यारोहकांना एव्हरेस्टवर चढण्यास बंदी घातली. त्यानंतर 2018 मध्ये मागर यांनी दिव्यांग संघटनांच्या प्रयत्नाने न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ती बंदी हटवली.

Hari Budha Magar
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

युद्धात पाय गमावले

ही गोष्ट 2010 सालची आहे. मागर हे अफगाणिस्तानमध्ये तैनात होते. त्यांना गस्तीची ड्युटी देण्यात आली होती. दरम्यान, त्यांचे दोन्ही पाय आयईडी स्फोटकांवर पडले. मोठा आवाज झाला. सुदैवाने त्याचा जीव वाचला पण त्याने दोन्ही पाय गमावले.

Hari Budha Magar
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

ते म्हणतात, दोन्ही पाय गमावल्यानंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. हिमालयन स्की ट्रेक कंपनीच्या मदतीने त्यांना कृत्रिम पाय मिळू शकले. त्यानंतर ते चालायला लागले. एव्हरेस्टवर चढाई करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मागर म्हणतात, कोणाच्याही वाट्याला असं दुःख येऊ नये.

Hari Budha Magar
Maruti Suzuki : या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार मारुतीची जिमनी

ते म्हणतात, मी एव्हरेस्टवर चढाई केल्याने अपंग लोकांमध्ये धैर्य निर्माण होईल अशी आशा आहे. आता मी माझ्यासारख्या दिव्यांग लोकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही पर्वतावर चढण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.