मोदींची लोकप्रियता उतरणीला लागलीय - हरी नरके

भारतातील समाजिक आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

भारतातील समाजिक आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. RSS आरक्षणाचा खंदा समर्थक असून जोपर्यंत देशात विषमता अस्तित्वात असेल तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम रहावी, असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित 'आधुनिक दलित इतिहासाचे जनक' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी भारतातील सामाजिक आरक्षणाबाबत बोलताना आरएसस आरक्षणाचा खंदा समर्थक असल्याचं म्हटलं होतं. जोपर्यंत देशात विषमता अस्तित्वात असेल तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम रहावी असं त्यांनी म्हटलं होतं. आता होसबाळे यांचा हा दावा राजकीय असल्याचं प्राध्यापक हरी नरके यांनी म्हटलय. हरी नरके यांनी ट्विटरवरून आरएसस आरक्षण पाठीराखा कधी झाला असा सवालही केला आहे. होसबाळे यांनी दिल्लीत इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित आधुनिक दलित इतिहासाचे जनक या पुस्तक प्रकाशनावेळी आरक्षणाबाबत विधान केलं होतं.

हरी नरके यांनी RSS आरक्षण पाठीराखा कधी झाला? असा प्रश्न ट्विटरवक विचारला आहे. तसंच रा स्व संघ आरक्षणाचा पाठीराखा असल्याचा सरकार्यवाह होसबाळे यांचा दावा राजकीय आहे असेही त्यांनी म्हटलं. एकतर आरक्षणमुक्त भारताच्या कार्यक्रमाने संघाचे तोंड पोळलेले आहे. मोदींची लोकप्रियता उतरणीला लागलेली आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. तिथे योगींनी ५ वर्षे बट्ट्याबोळ करून ठेवल्याने भाजपाचा पश्चिम बंगाल होणार हे Rss ला कळून चुकलंय. बरं ते बोलले कुठे तर एका दलितविषयक पुस्तकाच्या प्रकाशनात. समोर आरक्षण समर्थक श्रोते असल्याने राजकीय रणनीतीचे एक विधान म्हणूनच त्याच्याकडे बघायला हवे असं सांगत हरी नरके यांनी काही मुद्दे मांडले आहेत.

१) संघ जर आरक्षण समर्थक आहे तर होसाबाळेनी आरक्षण विरोधी वक्तव्यांबद्दल मोहन भागवत व मनमोहन वैद्य यांची राजस्थान व बिहार निवडणुकांपूर्वीची विधाने मागे घेऊन त्याबद्दल माफी मागितलीय का?

२)ओबीसीचे पंचायत राज्य आरक्षण शून्य झाले असताना ते वाचवण्या साठी त्यांचे मोदी 2011SECCचा डेटा राज्यांना का देत नाहीयत?

(३) Rss ची कथनी नी करणी परस्परविरोधी असते.2021च्या जनगणनेत ओबीसीची जातवार गणना करून ते ओबीसी आरक्षण का पुनर्स्थापित करीत नाहीयेत? न्यायालय म्हणते "डेटा नाही तर आरक्षण नाही" सरकार म्हणते "असलेला डेटा देणार नाही, 2021ला डेटा जमवणारही नाही." ही कृती तर थेट आरक्षणविरोधीच आहे.

(४) ते जर ओबीसीवादी आहेत तर मोदींनी ओबीसी बजेट ewsला का वळते केलेय?ओबीसीच्या तोंडचा घास काढून घ्यायचा नी आम्ही ओबीसीवादी आहोत असे बोलायचे ही तर शुद्ध ढोंगबाजी झाली.

५) NEETचे 2007पासून मिळणारे ओबीसी वैद्यकीय आरक्षण मोदींनी 2017ते21या काळात रद्द करून11000 obcचे नुकसान का केले?

६) मोदी केंद्रात ओबीसी कल्याण मंत्रालय का स्थापन करीत नाहीयेत?

७) Rss जर आरक्षणवादी आहे तर त्यांनी मंडल आयोगाला विरोध का केला होता?

८) Youth for equality, save merit save nation ही आरक्षणविरोधी मंडळी संघात कशी काय आहेत?त्यांची हाकालपट्टी संघ का करीत नाहीये? ही डबल ढोलकी का?

९) गेली ९६ वर्षे सामाजिक न्यायविरोधी वागणारा संघ आपली चातुर्वर्ण्यवादी गोळवलकरी भूमिका सोडून देऊन त्याबद्दल लेखी माफी का मागत नाहीये? संघाने आधीच्या सर्व चुका जाहीरपणे कबूल करून त्यातले बदल लेखी प्रकाशित केल्याशिवाय होसबालेन्च्या शब्दांना काहीच विश्वासार्हता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.