Euthanasia: "मुलाला इच्छामृत्यू द्या," 30 वर्षांच्या हरिशचे आई-वडील का करताहेत मागणी? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Euthanasia: "हरीशची फूड पाइप काढून त्याला इच्छामरण देऊ शकत नाही. फूड पाईप काढून टाकल्यानंतर तो उपासमारीने मरेल आणि नियमानुसार असा आदेश देता येऊ शकत नाही."
Euthanasia
EuthanasiaEsakal
Updated on

गाझियाबादचे 30 वर्षीय हरीश राणा गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ अंथरुणाला खिळून पडले आहेत. त्याची आई निर्मला देवी आणि वडील अशोक राणा यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात त्याला इच्छामरण देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

आपल्या आदेशात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना या विषयावर सरकारशी चर्चा करण्यास सांगितले आहे आणि हरीशच्या उपचारासाठी सरकारच्या काही योजना आहेत का ते सांगण्यास सांगितले आहे.

कोणती संस्था हरीशवर उपचार करू शकते का, अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, हरीशची फूड पाइप काढून त्याला इच्छामरण देऊ शकत नाही. फूड पाईप काढून टाकल्यानंतर तो उपासमारीने मरेल आणि नियमानुसार असा आदेश देता येऊ शकत नाही.

न्यायालयाने केंद्र सरकारला हरीशच्या पालनासाठी काही मार्ग काढता येईल का अशी विचारणा केली आहे.

Euthanasia
ED अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा, CBIच्या भीतीने रेल्वे समोर मारली उडी, जाणून काय आहे प्रकरण?

सादर केलेल्या याचिकेनुसार, 10 वर्षांपूर्वी हरीश चंदीगडमधील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्यावेळी तो त्याच्या हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मेंदू व शरीराला लकवा बसला.

आता तो गेल्या दहा वर्षांपासून अंथरुणाला खिळलेला असून त्याच्या शरीरात खाणे आणि शौचास जाण्यासाठी दोन पाईप टाकण्यात आले आहेत. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले की, हरीशवर उपचार करण्यासाठी आई-वडिलांनी आपली जमीन विकली आणि आतापर्यंत आपली सर्व बचत संपवली आहे. आता मुलाच्या उपचारासाठी खर्च करण्याची त्यांची परिस्थिती राहिली नाही.

Euthanasia
Champai Soren: झारखंडमध्येही सत्ताधारी पक्ष फुटला! चंपई सोरेन यांची नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा; युतीबाबतही दिले संकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.